स्पोर्ट्स

T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबला 'या' दिवशी

T20I World Cup: आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे.

रणजित गायकवाड

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी खेळवण्यात येणार आहे. वेळापत्रक जाहीर झाल्याने कोणत्या संघाला कोणत्या गटात स्थान मिळाले आहे, हे देखील स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांना पुन्हा एकदा एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. या दोन संघांमधील बहुप्रतिक्षित महामुकाबला कधी होणार, याची तारीखही आता समोर आली आहे.

पुढील वर्षी इंग्लंडमध्ये रंगणार महिला टी-20 विश्वचषक

महिला टी-20 विश्वचषक 2026 चे आयोजन पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणार आहे. ही या स्पर्धेची 10वी आवृत्ती असेल. जून महिन्यात होणाऱ्या या विश्वचषकाचा पहिला सामना 12 तारखेला खेळवला जाईल, ज्यात यजमान इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होईल. या विश्वचषक स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार असून, त्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा ठरू शकते, असे म्हटले जात आहे.

आयसीसीने यासाठी दोन गट तयार केले आहेत. गट 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह भारत आणि पाकिस्तान या संघांचा समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त आणखी दोन संघ यात सामील होतील, ज्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.

प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत

टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या गटालध्ये यजमान इंग्लंड व्यतिरिक्त न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. दोन संघ जागतिक पात्रता फेरीतून (ग्लोबल क्वालिफायर) येथे प्रवेश करतील. नियमांनुसार, सर्व संघ आपापल्या गटातील इतर संघांशी सामने खेळतील, त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीचे सामने 30 जून आणि 2 जुलै रोजी होतील. त्यानंतर 5 जुलै रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाईल.

भारत-पाकिस्तान महासंग्राम 14 जून रोजी

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने, त्यांच्यातील सामना साखळी फेरीतच होईल. हा सामना 14 जून रोजी खेळवला जाईल. हे दोन्ही संघ आता केवळ आयसीसी किंवा एसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात, त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे.

2026 मध्ये खेळल्या जाणा-या T20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक

  • 12 जून : इंग्लंड वि. श्रीलंका, एजबॅस्टन

  • 13 जून : पात्रताधारक संघ वि. पात्रताधारक संघ, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

  • 13 जून : ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

  • 13 जून : वेस्ट इंडिज वि. न्यूझीलंड, हॅम्पशायर बाऊल

  • 14 जून : पात्रताधारक संघ वि. पात्रताधारक संघ, एजबॅस्टन

  • 14 जून : भारत वि. पाकिस्तान, एजबॅस्टन

  • 16 जून : न्यूझीलंड वि. श्रीलंका, हॅम्पशायर बाऊल

  • 16 जून: इंग्लंड वि. पात्रताधारक संघ, हॅम्पशायर बाऊल

  • 17 जून : ऑस्ट्रेलिया वि. पात्रताधारक संघ, हेडिंग्ले

  • 17 जून : भारत वि. पात्रताधारक संघ, हेडिंग्ले

  • 17 जून : दक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान, एजबॅस्टन

  • 18 जून : वेस्ट इंडिज वि. पात्रताधारक संघ, हेडिंग्ले

  • 19 जून : न्यूझीलंड वि. पात्रताधारक संघ, हॅम्पशायर बाऊल

  • 20 जून : ऑस्ट्रेलिया वि. पात्रताधारक संघ, हॅम्पशायर बाऊल

  • 20 जून : पाकिस्तान वि. पात्रताधारक संघ, हॅम्पशायर बाऊल

  • 20 जून : इंग्लंड वि. पात्रताधारक संघ, हेडिंग्ले

  • 21 जून : वेस्ट इंडिज वि. श्रीलंका, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

  • 21 जून : दक्षिण आफ्रिका वि. भारत, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

  • 23 जून : न्यूझीलंड वि. पात्रताधारक संघ, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

  • 23 जून : श्रीलंका वि. पात्रताधारक संघ, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

  • 23 जून : ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, हेडिंग्ले

  • 24 जून : इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

  • 25 जून : भारत वि. पात्रताधारक संघ, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

  • 25 जून : दक्षिण आफ्रिका वि. पात्रताधारक संघ, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

  • 26 जून : श्रीलंका वि. पात्रताधारक संघ, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

  • 27 जून : पाकिस्तान वि. पात्रताधारक संघ, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

  • 27 जून : वेस्ट इंडिज वि. पात्रताधारक संघ, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

  • 27 जून : इंग्लंड वि. न्यूझीलंड, द ओव्हल

  • 28 जून : दक्षिण आफ्रिका वि. पात्रताधारक संघ, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

  • 28 जून : ऑस्ट्रेलिया वि. भारत, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

  • 30 जून : उपांत्य सामना 1 (संघ अ वि. संघ ब), द ओव्हल

  • 2 जुलै : उपांत्य सामना 2 (संघ क वि. संघ ड), द ओव्हल

  • 5 जुलै : अंतिम सामना (विजेता उपांत्य 1 वि. विजेता उपांत्य 2), लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT