Gautam Gambhir On Hardik Pandya pudhari
स्पोर्ट्स

Gautam Gambhir On Hardik Pandya: हार्दिक पांड्याला सतत संघातून बाहेर का ठेवलं जातं... गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं

Anirudha Sankpal

Gautam Gambhir On Hardik Pandya: नुकतेच बीसीसीआयने वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेसाठी वनडे आणि टी २० संघाची घोषणा केली. या संघात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या नावावर पुन्हा एकदा फुली मारण्यात आली आहे. सतत दुखापतग्रस्त असणारा पांड्या कधी भारतीय संघात कधी परतणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. संघ व्यवस्थापन देखील हार्दिक पांड्याबाबत सावध भूमिका घेत आहे. याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने हार्दिकबाबतचा संघ व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट केली.

गौतम गंभीरने हार्दिक पांड्या अजूनही पूर्ण १० षटके टाकू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली. गंभीर म्हणाला, 'संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घाई गडबडीत परत आणणार नाही. ज्यावेळी हार्दिक पांड्या पूर्ण पणे गोलंदाजी करण्यासाठी फिट होईल त्यावेळीच तो टीम इंडियात पुनरागमन करेल. त्या ऐवजी सध्या संघात नीतीश कुमार रेड्डी खेळत असून तो आमच्यासाठी हार्दिकचा पर्याय आहे.

कोणतीही घाई नाही

अफगाणिस्तानविरूद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात भारताने १२७ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर गंभीरने हार्दिकच्या फिटनेसबाबत चर्चा केली. गंभीर म्हणाला की, हार्दिक पांड्या या क्षणाला १० षटके टाकू शकत नाही. आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घाई गडबडीत आणणार नाही. ज्यावेळी तो फिट होईल त्यावेळी हार्दिक आणि नीतीश दोघेही खेळण्याची शक्यता आहे. हार्दिक खूप काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र त्याच्या फिटनेस आणि वर्कलोडमुळे त्याला सतत मॅनेज करावं लागतं. आता संघ व्यवस्थापनाची नजर त्याच्या गोलंदाजी बाबतच्या फिटनेसवर आहे.

फक्त फलंदाज म्हणून नाही

गंभीरच्या या नव्या वक्तव्यानुसार हार्दिक पांड्याकडे भारतीय संघ व्यवस्थापन फक्त फलंदाज म्हणून पाहत नाहीये. त्याची संघातील निवड ही त्याच्या अष्टपैलूत्वावरच होणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जर तो गोलंदाजीत योगदान देऊ शकत नसेल तर त्याचा विचार होणे अवघड आहे असेच गंभीरच्या वक्तव्यावरून दिसत आहे.

हार्दिक भारतीय अ संघाकडून खेळणार

दरम्यान, हार्दिक पांड्याची ऑस्ट्रेलिया अ विरूद्धच्या पुडुचेरीमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय अ संघात निवड झाली आहे. मात्र तो ही मालिका खेळणार की नाही हे बीसीसीआयच्या सेटर ऑफ एक्सेलन्समध्ये पांड्याला मिळणाऱ्या फिटनेस सर्टिफिकेटवर अवलंबून असणार आहे.

सध्याच्या घडीला तरी भारतीय संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याच्या बाबतीत घाई गडबडीत कोणताही निर्णय घेणार नाही असं दिसतंय. त्याचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन हे तो पूर्ण क्षमतेने १० षटके टाकू शकला तर होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT