Fatima Sana cricket record 2026 pudhari
स्पोर्ट्स

Fatima Sana cricket record 2026: जे बाबर, रिझवानही करू शकला नाही ते फातिमा सनाने करून दाखवलं... भारताच्या ऋचा घोषलाही टाकलं मागं

Anirudha Sankpal

Fatima Sana cricket record 2026: पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सना हिने झिम्बाब्वेविरूद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात एक मोठा धमाका केला. सनाने पाकिस्तानचे दिग्गज फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानलाही पाकिस्तानसाठी जे जमलं नाही ते करून दाखवलं आहे.फातिमा सनाने फक्त १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. याचबरोबर ती आंतरराष्ट्रीय टी २० महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगान अर्धशतक ठोकणारी खेळाडू ठरली आहे.

फातिमाने केला विश्वविक्रम

महिला आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा मान हा न्यूझीलंडच्या सोफी डिवाईन आणि भारताच्या ऋचा घोष यांना मिळाला होता. त्या दोघींना प्रत्येकी १८ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. मात्र आता हे रेकॉर्ड पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने मोडले आहे तिने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

याचबरोबर फातिमाने महिला टी २० क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वात वेगवान अर्धशक ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये वार्विकशरकडून खेळणाऱ्या मेरी केलीने १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. लॉरा हॅरिसने देखील २०२५ मध्ये सुपर स्मॅश लीगमध्ये अशीच कामगिरी केली होती.

बाबर, रिझवानलाही जमलं नाही

पाकिस्तानकडून महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा कारनामा यापूर्वी निदा दारने केला होता. २०१९ मध्ये तिने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध २० चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. पाकिस्तानात बाबर आणि रिझवान हे टी २० मधील दमदार फलंदाज मानले जातात. मात्र या दोघांनाही टी २० क्रिकेटमध्ये १५ चेंडूत अर्धशतकी खेळी करता आलेली नाही.

पाकिस्तानचा मोठा विजय

फातिमाने आपल्या या खेळीत १९ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह ६२ धावा केल्या. तसेच सायरा जबीन हिने देखील ३२ चेंडूत ५० धावा ठोकल्या होत्या. या दोन दमदार खेळींच्या जोरावर पाकिस्तानने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात २३३ धावा ठोकल्या. झिम्बाब्वेचा संघ हे आव्हान पार करताना १७.१ षटकात ९० धावातच ढेर झाला. पाकिस्तानने हा सामना १३३ धावांनी जिंकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT