Smriti Mandhana record | स्मृतीने मागे टाकला रोहितचा विक्रम

...तरीही भारत पहिल्या सामन्यात पराभूत
Smriti Mandhana record |
Smriti Mandhana record | स्मृतीने मागे टाकला रोहितचा विक्रम
Published on
Updated on

दरबान; वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात नवा इतिहास रचला. मानधनाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला असून, या निकषावर तिने दिग्गज फलंदाज रोहित शर्माला मागे टाकले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात तिने हा टप्पा सर केला. या लढतीपूर्वी ती 4,231 धावांसह रोहित शर्मासह बरोबरीत होती. पुढे पहिल्या डावानंतर तिच्या खात्यावर 4,244 धावांची नोंद झाली. तिने 155 डावांमध्ये 30.31 च्या सरासरीने ही धावसंख्या उभारली असून त्यात एक शतक आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर महिला क्रिकेटमध्ये केवळ न्यूझीलंडची सुझी बेट्स (4,717 धावा) आता स्मृतीच्या पुढे आहे.

भारत 6 गड्यांनी पराभूत

दुसरीकडे, स्मृतीच्या या वैयक्तिक विक्रमानंतरही भारतीय महिला संघाला मालिकेच्या सलामीच्या सामन्यात 6 गडी राखून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद 47) आणि शफाली वर्मा (34) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने 157 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डने 51 धावांची संयमी खेळी करत आणि अ‍ॅनेरी डर्कसेनने नाबाद 44 धावांची फटकेबाजी करत यजमानांना विजय मिळवून दिला. भारताला डेथ ओव्हर्समध्ये धावसरासरी उंचावता न आल्याचा यात फटका बसला.

उभय संघातील दुसरी टी-20 आज

आता उभय संघांमधील दुसरा सामना आज (रविवार, दि. 19) किंग्समेड मैदानावर खेळवला जाईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5.30 वाजता सुरुवात होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news