Asia Cup 2025 : आगामी पुरुष आशिया चषकाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार नाही, असे बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदे(ACC)कडे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. जून २०२५ मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या महिला इ आशिया कप आणि 2025 मध्ये होणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय संघाने नोंदणी मागे घेतली आहे. मात्र, या वृत्ताबाबत अद्याप बीसीसीआयकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
‘द इंडियन एक्सप्रेस’ च्या अहवालानुसार, . गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आशिया चषक स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी आहेत.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटलं आहे की, आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष हे पाकिस्तानी आहेत. या स्पर्धेतचे आयोजन ACC करत आहेत. अशावेळी देशाच्या भावनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. आम्ही महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून माघार घेतल्याची माहिती ACC ला तोंडी दिली आहे. भविष्यातील त्यांच्या कोणत्याही स्पर्धेत भारताचा सहभाग नसेल. याबाबत आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत.”
आशिया कप २०२५ भारतात होणार होता. पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धा ही टी20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार होती. २०२३ आशिया कप भारताने श्रीलंकेचा पराभव करून जिंकला होता. या स्पर्धेचे बहुतांश प्रायोजक भारतातील असल्यामुळे BCCI चा हा निर्णय स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. भारतासोबतच श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
२०२४ मध्ये आशिया कप पाकिस्तानने आयोजित केला होता. मात्र BCCI ने भारताचा संघ पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. त्याचप्रमाणे, या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीतही हायब्रीड मॉडेल वापरण्यात आले होते. भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले गेले होते.