प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari Photo
स्पोर्ट्स

Cricket World Cup Final | तब्‍बल २०० टक्‍के भाडेवाढ..! अहमदाबादला पोहचण्‍यासाठी क्रिकेट चाहत्‍यांची उडाली 'झुंबड'

Cricket World Cup Final | तिकिटांचाही काळा बाजार, हजारांचे तिकीट १५ हजारांना!

पुढारी वृत्तसेवा

  • टी-२० विश्वचषकाच्या फायनल पाहण्‍यासाठी चाहत्‍याचा उत्‍साह शिगेला

  • विमानाचे दर गगनाला

  • रेल्‍वेची विशेष सोय

  • बनावट तिकिटांचाही धोका

Cricket World Cup Final

अहमदाबाद : भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आता येथील नरेंद्र मोदी स्‍टेडियमकडे लागल्‍या आहेत. या सामन्‍यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होणार असली, तरी अहमदाबादला पोहोचणे आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे राहिलेले नाही. विमानाची तिकिटे आणि रेल्वेच्या उपलब्धतेअभावी चाहत्यांची मोठी कोंडी होत आहे. प्रमुख महानगरांमधून अहमदाबादला जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले असून, विमान कंपन्यांनी परतीच्या प्रवासाच्या दरात तब्‍बल २०० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. दरम्‍यान, चाहत्यांमध्ये असणार्‍या0 प्रचंड उत्साह संधीचा फायदा घेत तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू झाला आहे. मूळ किंमत २,००० रुपये असलेल्या तिकिटांची विक्री सोशल मीडियावरून १० ते १५ हजार रुपयांना केली जात आहे.

विमान प्रवासाचे दर गगनाला

'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे विमानभाडे सामान्यतः ४,५०० ते ६,००० रुपयांच्या दरम्यान असते. मात्र, ७ मार्चच्या प्रवासासाठी हे दर १६,५८५ रुपयांवर पोहोचले आहेत, तर ९ मार्चच्या परतीच्या प्रवासासाठी १६,९०० रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईहून सकाळी १० वाजता सुटणाऱ्या विमानाचे तिकीट तर चक्क ३३,०७१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशीच स्थिती चेन्नई आणि दिल्ली येथे असून, तेथून अहमदाबादसाठी अनुक्रमे १८,००० आणि २१,००० ते ३३,००० रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत.

रेल्वे आणि मेट्रोची विशेष सोय

वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद एसी सुपरफास्ट 'तेजस स्पेशल' (०९०२७/०९०२८) मध्ये अतिरिक्त डबे जोडले आहेत. या गाडीत आता १५ ऐवजी १९ डबे असतील. सामन्याच्या दिवशी मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असून, मोटेरा स्टेडियमसाठी विशेष 'पेपर तिकीट' देण्याचा विचार प्रशासन करत आहे.

२ हजारांचे तिकीट १५ हजारांना; प्रीमियम सीट्स दीड लाखांच्या पार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या महामुकाबल्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू झाला आहे. मूळ किंमत २,००० रुपये असलेल्या तिकिटांची विक्री सोशल मीडियावरून १० ते १५ हजार रुपयांना केली जात आहे. तर अतिशय आलिशान मानल्या जाणाऱ्या 'प्रेसिडेंट गॅलरी'च्या तिकिटांची किंमत १.५० लाख रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे.

बनावट तिकिटांचाही धोका

काळाबाजारात तिकीट खरेदी करताना चाहत्यांची फसवणूक होण्याचे प्रकारही वाढले आहेत. काही फसवणूक करणारे लोक मूळ तिकिटांच्या रंगीत फोटोकॉपी करून त्या हजारो रुपयांना विकत आहेत. प्रत्यक्षात स्टेडियमच्या गेटवर स्कॅनिंग करताना ही तिकिटे बनावट असल्याचे उघड होत असल्याने अनेक चाहत्यांचा हिरमोड होत आहे. टोकन रक्कम घेऊन ग्राहकांना ब्लॉक करण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT