Ben Stokes Night Club Scandal: इंग्लंड क्रिकेटमध्ये अनेक स्कँडल झाली आहेत ज्यामुळं त्यांच्या कर्णधारांना आपलं पद सोडावं लागलं आहे. अनेकांना संघातील स्थान देखील गमवावं लागलं आहे. आता इंग्लंड क्रिकेटला अजून एका स्कँडलचा फटका बसला आहे. इंग्लडने न्यूझीलंडविरूद्धची पहिली कसोटी जिंकल्यानंतर सोमवारी नाईट क्लबमध्ये एक घटना घडली. या घटनेत इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस एकिन्सन यांचा समावेश होता अशी पुष्टी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून अजून तरी याबाबत कोणती माहिती समोर आलेली नाही.
मात्र या नव्या स्कँडलमुळं बेन स्टोक्सचे कर्णधारपद पणाला लागलं आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू आणि साराकेन्स रग्बी खेळाडूंमध्ये सोमवारी सकाळी वाद झाला होता. त्यात बेन स्टोक्स आणि इंग्लंडच्या काही खेळाडूंचा समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार स्टोक्स आणि एटकिन्सन यांनी इंग्लंड संघाच्या मिडनाईट कर्फ्यू नियमाचे उल्लंखन केले. इंग्लंडने अॅशेस हरल्यानंतर हा नियम लागू केला होता. हे दोन्ही क्रिकेटपटू हे रग्बी खेळाडूंशी भिडले होते. रग्बी खेळाडूने एटकिन्सनला पंच मारला होता असा दावा करण्यात आला आहे. मात्र हा पंच इसीबीच्या सुरक्षा रक्षकाला लागला होता. हा सुरक्षा रक्षक नाईट क्लबमध्ये खेळाडूंवर नजर ठेवून होता.
मिळालेल्या माहितीनुसार या सुरक्षा रक्षकाला टाके पडले आहेत. स्टोक्स आणि एटकिन्सन हे काही जखमी झालेले नाहीत. इसीबीने स्टोक्स आणि एटकिन्सन हे अॅग्रेसिव्ह झाले नव्हते असं सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा हस्तक्षेप नव्हता.
मात्र स्टोक्सच्या कॅप्टन्सीबाबत पुन्हा विचार केला जात आहे. इसीबी त्याला नाईट क्लबमधील घटनेनंतर कर्णधारपदावरून हटवू शकते. दे टेलिग्राफ क्लबचे देखील वक्तव्य छापलं आहे. 'आम्हाला घडलेल्या घटनेची कल्पना आहे. साराकेन्सशी संबंधित खेळाडूचा या घटनेत सहभार होता.'
क्लबमधील सूत्र पुढे म्हणतो की, 'क्लब सर्व तथ्य समोर ठेवत आहे. सध्या आम्ही याबाबतच्या ऑथोरिटी आणि सामील व्यक्ती यांच्या संपर्कात आहोत. एकदा का सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की आम्ही या प्रकरणाबाबत भाष्य करू.'
इंग्लिश रग्बीमधील वरिष्ठ सूत्राने द टेलिग्राफला सांगितलं की या सर्व हाणामारीला अकॅडमी खेळाडू जबाबदार आहे. या प्रकरणात स्टोक्सची कॅप्टन्सी जात असेल तर ते दुर्दैवी आहे.
काय आहे नाईट कर्फ्यू?
गेल्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून ४-१ असा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मिडनाईट कर्फ्यू लागू केला होता. इसीबीने नव्या कोड ऑफ कंडक्टनुसार हा कर्फ्यू लागू केला होता. मात्र सोमवारी बेन स्टोक्स आणि एटकिन्सन यांनी याचे उल्लंघन केलं. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही खेळाडू न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. हा कसोटी सामना १७ जूनपासून ओव्हलवर सुरू होत आहे.
जर स्टोक्स हा सामना खेळू शकला नाही तर या सामन्यासाठी हॅरी ब्रुक्स इंग्लंडचा कर्णधार असू शकतो. इसीबीने दुसऱ्या कसोटीसाठीच्या संघाची घोषणा देखील थांबवली आहे.
स्टोक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाद त्याच्यासाठी काही नवीन नाहीयेत. २०१७ मध्ये ब्रिस्टोलमध्ये देखील असाच रात्री राडा झाला होता. त्यात स्टोक्सचा देखील समावेश होता. त्यावेळी त्याला इंग्लंडचे उपकर्णधारपद गमवावे लागले होते. या प्रकरणी त्याच्या मागे कोर्ट कचेरी देखील लागली होती.
स्टोक्सने २०२५ मध्ये मद्यपान सोडलं होतं. तो दुखापतीतून सावरत होता. मात्र लॉर्ड्सवरील न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीनंतर स्टोक्सने पुन्हा दारू पिल्याचे मान्य केलं आहे.