Asia Cup Rising Stars 2026 pudhari
स्पोर्ट्स

Asia Cup Rising Stars 2026: पराभवाचे उट्टे काढण्याची नामी संधी मिळणार.. भारत-पाक पुन्हा भिडणार, सेमी फायनलचं वेळापत्रक जाहीर

कतारची राजधानी दोहामध्ये सुरू असलेल्या आशिया कप रायजिंग स्टार्स २०२६ च्या सेमी फायनलचे शेड्युल निश्चित झाले आहे.

Anirudha Sankpal

Asia Cup Rising Stars 2026: कतारची राजधानी दोहामध्ये सुरू असलेल्या आशिया कप रायजिंग स्टार्स २०२६ च्या सेमी फायनलचे शेड्युल निश्चित झाले आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना झाल्यावर सेमी फायनलमध्ये कोण कोण भिडणार याचे चित्र स्पष्ट झाले. याचबरोबर आता भारताला पाकिस्तान विरूद्धच्या साखळी फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी मिळणार आहे. भारत पाकिस्तान यांच्यात फायनल होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वेगवेगळ्या संघांसोबत सेमी फायनल खेळणार आहेत.

सेमी फायनलिस्ट चार संघ

दोहा मध्ये सुरू असलेल्या रायजिंग स्टार्स स्पर्धेत आशियातील ८ संघांनी सहभाग घेतला होता. यात ग्रुप अ मध्ये अफगाणिस्तान अ, हाँगकाँग, चीन हे संघ बाहेर गेले आहेत. तर ग्रुप बी मधून नेपाळ, युएई यांचे देखील आव्हान संपुष्टात आले आहे.

सेमी फायनलमध्ये भारत अ, पाकिस्तान अ, श्रीलंका अ आणि बांगलादेश अ या संघांचा समावेश आहे. सेमी फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार नाही. मात्र हे दोन्ही संघ फायनलमध्ये एकमेकांसमोर येऊ शकतात.

असे असेल शेड्युल

आशिया कप रायजिंग स्टार २०२६ चे सेमी फायनलचे शेड्युल जाहीर झालं आहे. ग्रुप अ ची टॉपर श्रीलंकेसोबत भारत अ संघ भिडणार आहेत. तर ग्रुप ब ची टॉपर पाकिस्तान ग्रुप अ मधील बांगलादेश अ सोबत खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सेमी फायनल उद्या म्हणजे २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर पाकिस्तान अ आणि बांगलादेश अ हे २७ नोव्हेंबर रोजी एकमेकांना भिडतील. स्पर्धेची फायनल ही रविवारी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सेमी फायनलचे शेड्युल

पहिला सामना - २६ नोव्हेंबर - भारत अ विरूद्ध श्रीलंका अ दुपारी ३.३०

दुसरा सामना - २७ नोव्हेंबर - पाकिस्तान अ विरूद्ध बांगलादेश अ - दुपारी ३.३०

फायनल - रविवार २९ नोव्हेंबर सेमी फायनल १ मधील विजेता विरूद्ध सेमी फायनल २ मधील विजेता - दुपारी ३.३०

भारत पाकिस्तान संभाव्य फायनल

जर भारत अ संघाने श्रीलंका अ संघाचा सेमी फायनलमध्ये पराभव केला आणि दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात पाकिस्तान अ संघाने बांगलादेश अ संघाचा पराभव केला तर भारत आणि पाकिस्तान फायनल होण्याची दाट शक्यता आहे. जर असं झालं तर भारताला साखळी फेरीतील पाकिस्तानविरूद्धच्या पराभवाचे उट्टे काढण्याची नामी संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT