India vs South Africa 2nd T20  Pudhari
स्पोर्ट्स

India vs South Africa: 'या' तीन कारणांमुळे टीम इंडियाचा पराभव; भारताची संपूर्ण टीम का कोसळली?

India vs South Africa 2nd T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला 51 धावांनी पराभव स्विकारावा लागला. अर्शदीप सिंहच्या निष्काळजी गोलंदाजीसह ओपनर्सचा फ्लॉप शो यामुळे पराभव झाला आहे.

Rahul Shelke

India vs South Africa 2nd T20 Loss Reasons: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाला 51 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुल्लांपूर, न्यू चंदीगड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेल्या चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या भारताला दुसऱ्या सामन्यातील निराशाजनक प्रदर्शनामुळे मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आहे.

अर्शदीप सिंहची खराब गोलंदाजी

भारताच्या पराभवाची सुरुवातच अर्शदीप सिंहच्या अतिशय खराब गोलंदाजीपासून झाली.
त्याने 4 षटकांत तब्बल 54 धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही.

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे—

  • एकाच षटकात त्याने 13 चेंडू टाकले

  • त्यात 7 वाईड्स

  • सामन्यात एकूण 16 वाईड दिले, त्यातील 9 वाईड एकट्या अर्शदीपचे होते

यामुळे टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या 10 षटकांत 123 धावा काढल्या.

गिल आणि अभिषेक अपयशी

भारताची ओपनिंग जोडी या सामन्यातही फेल ठरली. शुभमन गिल खातेही न उघडता बाद झाला, तर अभिषेक शर्मा 17 धावांवर बाद झाला. ओपनिंगची सुरुवात टी20 सामन्यांमध्ये निर्णायक ठरते; मात्र भारतीय संघाला पुन्हा एकदा स्थिर सुरुवात मिळाली नाही. या दोघांच्या अपयशाने मधल्या फळीवर दबाव आला.

कर्णधार सूर्यकुमार यादवची फलंदाजी

सूर्यकुमार यादव सामन्यात गोंधळलेला दिसला. तो केवळ 5 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने त्याच विकेटवर धावांचा डोंगर उभारला, जो भारतीय फलंदाजांना जमला नाही.

भारतीय गोलंदाज अपयशी

  • जसप्रीत बुमराह — 4 षटकं, 45 धावा, 0 विकेट

  • हार्दिक पंड्या — नियंत्रण राखण्यात अपयशी

  • इतर गोलंदाज — विकेट मिळवण्यात अपयशी

बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजानेही 4 षटकात जास्त धावा दिल्याने गोलंदाजी कोलमडली.

भारतीय खेळाडूंच्या चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय

या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या चुका गंभीर स्वरूपाच्या होत्या—

  • गोलंदाजीतील शिस्त ढासळली

  • फलंदाजांनी दबावाखाली विकेट्स गमावल्या

  • 22 अतिरिक्त धावा दिल्या

  • प्रमुख आणि अनुभवी खेळाडू सतत अपयशी ठरले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT