

प्रसार भारती लिलावात उतरणार
आमच्याकडे ott प्लॅटफॉर्म देखील
संपूर्ण प्रसारण हक्क नाही तर काही स्पर्धा तरी....
Prasar bharti dd interested in the ICC media rights: आयसीसी माध्यम हक्क डीलमध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे. JioStar ने अर्ध्यावरतीच डाव मोडल्यानंतर आता आयसीसी समोर टी २० वर्ल्डकपपूर्वी नवा मीडिया पार्टनर शोधण्याची वेळ आली आहे. नव्या डीलसाठी netflix आणि amazon prime साऱखे तगडे ott प्लेअर्स रेसमध्ये आहेत. तसेच सोनी स्पोर्स्ट नेटवर्कसोबत देखील आयसीसीची बोलणी सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यात आता भारतीय प्रसारण मंत्रालयाच्या प्रसार भारतीनं उडी घेतल्याचे सूत्रांकडून कळते आहे.
बेस्ट मीडिया इन्फोने दिलेल्या वृत्तानुसार प्रासरण मंत्रालय अर्थात MIB च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रसार भारती आयसीसीच्या माध्यम हक्क मिळवण्याच्या रेसमध्ये उतरणार आहे. उर्वरित हंगामासाठी आयसीसीच्या माध्यम हक्क लिलावाच्या प्रक्रियेत प्रासर भारती देखील भाग घेणार आहे. याबाबत आताच काही बोलणं घाईचं ठरेल असंही हा अधिकारी म्हणाले.
अधिकाऱ्याने बेस्ट मीडियाला सांगितले की, 'आयसीसी त्यांच्या माध्यम हक्कांची विभागणी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यात भारतात खेळले जाणारे सामने आणि भारताबाहेर खेळले जाणारे सामने किंवा स्पर्धेच्या अनुशंगाने देखील विभागणी केली जाऊ शकते. जो कोणताही फॉरमॅट समोर येईल आम्ही नक्कीच या लिलावात भाग घेऊ.'
प्रसार भारतीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रसार भारतीकडे दूरदर्शन, डीडी फ्री-डीश आणि ott प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर आम्हाला सामने ब्रॉडकास्ट करण्याची इच्छा आणि विशिष्ट असं बजेट देखील आहे. अधिकाऱ्याने जरी आम्ही प्रसारणाचे संपूर्ण हक्क मिळवू शकलो नाही तरी आमच्या आवाक्यात असणाऱ्या काही स्पर्धांसाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. यात भारतात होणारे सामने किंवा इतर आंतरराष्ट्रीय मालिकांचा समावेश असेल.