पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांना दुसर्यांदा कोरोनाची लागण( Sourav Ganguly Corona ) झाली आहे. यापूर्वी त्यांना जानेवारी महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.
सौरभ यांना कोरोनाची लक्षण दिसून आली. त्यांनी चाचणी केल्यानंतर सोमवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात सौरभ यांना ह्दयविकाराचा झटका आला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. यावेळी त्यांना कारोनाची बाधा झाली होती. यांनतर त्यांनी कोरोना प्रतिबंधक दोन डोसही घेतले. आता त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचलं का?