लशीला विरोध करणाऱ्या जगजेत्ता बॉक्सिंगपटूचा कोरोनाने मृत्यू | पुढारी

लशीला विरोध करणाऱ्या जगजेत्ता बॉक्सिंगपटूचा कोरोनाने मृत्यू

लशीला विरोध करणाऱ्या जगजेत्ता बॉक्सिंगपटूचा कोरोनाने मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

बेल्जियममधील  किक बॉक्सिंग चॅंपियन फ्रेड्रिक सिनिस्ट्रा याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बेल्जियमपासून काही अंतरावर असलेल्या सिनी शहरात राहात्या घरी त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. फ्रेड्रिकचे वय ४१ होते. त्याच्या बायकोने सोशल मीडियावर मृत्यूची माहिती दिली आहे. फ्रेड्रिक सिनिस्ट्रने सातत्‍याने काेराेना प्रतिबंधक लसीचा  विराेध केला हाेता.

फ्रेड्रिक याने यापूर्वी एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये त्याने कोरोनाचा उल्लेख किरकोळ व्हायरस असा केला हाेता. त्याने कोरोनाविरोधात सरकारने सुरू केलेल्या उपाययोजनांना विरोध सुरूच ठेवणार, असंही म्हटलेले होते. फ्रेड्रिकला कोरोना झाल्यानंतर त्यांच्या कोचने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. पण त्याने रुग्णालयातून डिसचार्ज घेऊन घरातूनच स्वतःवर उपचार सुरू केले होते. तसे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचलं का?

Back to top button