पुढारी ऑनलाईन डेस्क : अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे निधन. ती २६ वर्षांची होती. याबाबत माहिती सोफियाचे सावत्र वडिल यांनी निवेदन देत सागितली आहे. त्यांच्या मते सोफिया काही दिवसांपूर्वी तिच्या अपार्टमेंटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली होती. सोफियाची आई तिच्या मृत्यूने कोलमडली आहे. तर कुटुंबीय आणि मित्रमंडळींनाही मोठा धक्का बसला आहे. (Sophia Leone Death)
गेल्या काही महिन्यात ॲडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींच्या निधनाच्या बातम्या येत आहेत. जानेवारीमध्ये, थायना फील्ड्स ही तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. फेब्रुवारीमध्ये ३६ वर्षीय काग्ने लिन कार्टरने जीवन संपवले होते. थायना आणि कागनी यांच्या निधनानंतर आणखी एक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध ॲडल्ट स्टार सोफिया लिओनचेही निधन झाले आहे. २६ वर्षीय सोफिया नुकतीच तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे.
सोफिया लिओनचे सावत्र वडील माईक रोमेरो यांनी GoFundMe वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तिच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे. सोफियाच्या वडिलांनी सांगितले की, अभिनेत्रीच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. तिची आई आणि कुटुंबीयांच्या वतीने मला आमच्या प्रिय सोफियाच्या निधनाची बातमी सांगावी लागत आहे. सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिचे कुटुंब आणि मित्रांना धक्का बसला आहे.
हेही वाचा