Miss World 2024 : ब्रेकिंग! झेक प्रजासत्ताकची क्रिस्टीना पिस्कोवा बनली ७१ वी ‘मिस वर्ल्ड’

Miss World 2024 : ब्रेकिंग! झेक प्रजासत्ताकची क्रिस्टीना पिस्कोवा बनली ७१ वी ‘मिस वर्ल्ड’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  झेक प्रजासत्ताकमधील क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने 9 मार्च रोजी भारतात झालेल्या मिस वर्ल्ड 71 वी स्पर्धा जिंकली आहे. तिला मिस वर्ल्ड 2024 चा ताज मिळाला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला. लेबनॉनची यास्मिना जायतौन ही पहिली उपविजेती ठरली. Miss World 2024

क्रिस्टिना लॉ आणि  व्यवसाय प्रशासनया दोन्ही विषयात दोन पदवीचे शिक्षण घेत आहे आणि मॉडेल म्हणूनही काम करत आहे. तिच्या सोशल मीडियानुसार तिने क्रिस्टिना पिस्स्को फाउंडेशनची (Krystyna Pyszko Foundation) स्थापना केली. ७० वी मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का हिने  क्रिस्टिनाला मुकुट घालून तिचा सन्मान केला. 28 वर्षांच्या विश्रांतीनंतर, मिस वर्ल्ड फिनाले भारतात पार पडला. त्यामुळे या स्पर्धेच्या वारशातील भारतीयासाठींचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे.

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, क्रिस्टिनाचा हा सर्वात अभिमानाचा क्षण म्हणजे टांझानियामध्ये वंचित मुलांसाठी इंग्रजी शाळा उघडणे, जिथे तिने स्वयंसेवा केली. तिला ट्रान्सव्हर्स बासरी आणि व्हायोलिन वाजवायला आवडते आणि आर्ट अकादमीमध्ये नऊ वर्षे घालवल्यानंतर तिला संगीत आणि कलेची आवड आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss World (@missworld)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news