shaitan movie
shaitan movie

Shaitaan Movie : ‘शैतान’चा बॉक्स ऑफिसवर कहर, पहिल्या दिवशी कोटींची कमाई

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगन, आर माधवन आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' ८ मार्च रोजी चित्रपटामध्ये रिलीज झाला. 'शैतान' टीजर रिलीज झाल्यापासून चित्रपटाची चर्चा सुरु होती. (Shaitaan Movie) अजय देवगन आणि ज्योतिका स्टारर चित्रपटात आर माधवनचा अभिनयदेखील सर्रस ठरला आहे. पहिल्याच दिवशी 'शैतान'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. 'शैतान'च्या पहिल्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. (Shaitaan Movie)

शैतानचा पहिल्या दिवसाचे कलेक्शन

सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रपट 'शैतान' शुक्रवारी चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. एका वेबसाईटनुसार, बॉक्स ऑफिसवर १५.५० कोटींची कमाई केली.

शैतान चित्रपटाचे दिग्दर्शन ८ मार्च, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. अजय देवगन, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक निर्माते आहेत.

याशिवाय अजय देवगनचा चित्रपट 'औरों में कहां दम था' आणि 'मैदान' एप्रिलमध्ये रिलीज होत आहे. याशिवाय चित्रपट 'सिंघम अगेन' ऑगस्टमध्ये आणि 'रेड २' नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. तर आर माधवन शशिकांत यांचा क्रिकेट ड्रामा, 'टेस्ट', 'अधिष्ठासली' आणि 'जीडी नायडू बायोपिक' मध्येही दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news