Chennai Floods 
Latest

Chennai Floods : चेन्नईतील पूरग्रस्तांना सोनू सूदची अनोखी मदत

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई पूरग्रस्तांना मदत करताना सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत येऊन अनेक लोकासाठी आशेचा किरण बनला आहे. चक्रीवादळ मिचौंगचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांना केवळ भौतिक मदत करण्यासाठी सोनू सूद पुढे सरसावला आहे. ( Chennai Floods )

संबंधित बातम्या

सोनू सूद समाज कल्याणासाठी म्हणून ओळखला जातो आणि सोनू सूद फाऊंडेशन या त्यांच्या प्रतिष्ठानद्वारे समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी तो कायम मदतीसाठी पुढे येतो. अत्यावश्यक वस्तूंचे वाटप, वैद्यकीय मदत आणि घरांच्या पुर्नबांधणीला पाठिंबा देणे यासह विविध बाबतीत सोनूने मदत केली आहे. परोपकारासाठी त्याच्या हाताशी असलेल्या दृष्टीकोनासाठी ओळखले जाणारे सोनू सूद मदत कार्यांवर सक्रियपणे देखरेख ठेवत आहे.

चेन्नईचे रहिवासी पुरानंतरच्या परिस्थितीला सामोरे जात असताना सोनू सूदचे चेन्नई फ्लड रिलीफसोबतचे सहकार्य नक्कीच उल्लेखनीय ठरत आहे. सोनू सूद आशेचे प्रतीक बनून आजवर सगळ्यासाठी प्रेरणा देणारा ठरला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यावर सोनूने झी स्टुडिओज आणि ‍ त्याची निर्मिती शक्ती सागर प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने 'फतेह' ही त्याची पहिली निर्मिती पूर्ण केली आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित होणार्‍या "फतेह" मध्ये उत्कृष्ट अभिनय, मनमोहक केमिस्ट्री, थरारक हॉलिवूड-शैलीतील स्टंट असामान्य लोकेशन्स आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. ( Chennai Floods )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT