मनोरंजन

Sidharth Shukla : सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यूच्या अखेरच्या क्षणी काय घडलं? शहनाज गिल होती जवळ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : बिग बॉस १३ व्या सीझनचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याला हार्ट ॲटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची रुग्णालयाने पुष्टी केली. असे म्हटले जाते की, शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृत्यूवेळी अभिनेत्री शहनाज गिल त्याच्याजवळ होती. त्याच्या मृत्यूच्या अखेरच्या क्षणी काय घडलं होतं?

अधिक वाचा-

शुक्लाला जेव्हा गुरुवारी रात्री अस्वस्थता जाणवली. तेव्हा शहनाज गिल त्याच्याजवळ होती. सिद्धार्थ तिच्या कुशीत डोके ठेवून झोपला होता. आणि झोपेतचं त्याचा मृत्यू झाला.

अधिक वाचा-

शुक्लाच्या अचानक मृत्यूने टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी (२ सप्टेंबर) रोजी सकाळी शुक्लाचा हार्ट ॲटॅकने मृत्यू झाला. पण, कुणालाच या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. तो या जगात आता नाही, हे कुणालाचं पटले नाही.

अधिक वाचा-

गिलचा तो खास मित्र होता. त्याच्या मृत्यूनंतर गिलची अवस्था वाईट आहे. शहनाजचे वडील संतोख सिंह म्हणाले की, त्याच्या मृत्यूनंतर ती बोलण्याच्या स्थितीत नाही. ती काहीचं बोलत नाही.

यादरम्यान, समजलं आहे की, त्याच्या मृत्यूवेळी शहनाजच्या मांडीवर त्याने डोके ठेवून अखेरचा श्वास घेतलाय.

सुत्रांच्या माहितीनुसार, शुक्लाला श्रद्धांजली देण्यासाठी जेव्हा लोक त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा अन्य सूत्रांनी सांगितलं की, शहनाज मानसिक धक्क्यात आहे. तिला अजुनही पटत नाहीये की तो आता या जगात नाही.

सिध्दार्थ – शहनाज

अस्वस्थ वाटू लागल्यानंतर पाजलं पाणी

मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ बुधवारी रात्री साडे नऊ वाजता घरी परतला होता. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यावेळी घरी त्याची आई होती. आणि शहनाज गिलदेखील होती.

त्याला त्याच्या आईने लिंबू पाणी पाजवलं होतं. त्याला बरं वाटावं म्हणून आईस्क्रीम खाण्यास दिलं. पण, त्याला स्वस्थ वाटत नव्हतं. त्याला छातीत दुखत होतं. आणि अस्वस्थ वाटत होतं. तेव्हा त्याच्या आईने आणि शहनाजने त्याला आराम करण्यास सांगितलं.

पाठीवरून हात फिरवण्यास सांगितलं

सूत्रांच्यानुसार, सिद्धार्थ शुक्ला झोपू शकत नव्हता. तो अस्वस्थ होता. त्याने शहनाजला आपल्या जवळ थांबण्यास सांगितले. त्याने तिला पाठीवरून हात फिरवण्यास सांगितले. रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान, तो गिलच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपला.

झोपेतचं त्याचा मृत्यू झाला. हळूहळू तिचाहा डोळा लागला. सकाळी ७ वाजता जेव्हा ती उठली. तेव्हा तिने पाहिलं की, सिद्धार्थ रात्रभर एकाच पोझिशनमध्ये झोपला आहे. त्याची कुठलीही हालचाल नाही. हे पाहून तिने त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. पण, कुठलीही हालचाल दिसली नाही.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT