मुंबई ; पुढारी ऑनलाईन: मराठी अभिनेत्री मोनालिसा बागल हिने लस घेतल्यानंतर चाहत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती स्वत: मोनालिसा बागल हिने सोशल मीडियावर दिली आहे.
मोनालिसाने आपल्या इंन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नर्स मोनालिसाला लस देताना दिसत आहे.
या फोटोसोबत मोनालिसाने #antibodies: लोड होत आहेत, त्यामुळे फोटो तर हवाच. चला मी आता सुरक्षित आहे. जास्त लोड न घेता तुम्ही पण लस घ्या. सुरक्षित व्हा आणि रिलॅक्स राहा. फक्त फोटोसाठी मास्क काढला होता हां. आणि हो, लस घेतल्यानंतर पण #wearmask आणि #staysafe. अशी कॅप्शन लिहिली आहे. यासोबत तिने हटके ईमोजी देखील शेअर केले आहेत.
मोनालिसाने स्वत: लस घेतल्यानंतर आपल्या चाहत्यांनाही लसीकरण करून घ्यावे असा सल्ला दिला आहे. 'व्हॅक्सिनेशन' ही काळाची गरज आहे, भविष्याची गरज आहे, असं म्हटलं तरी ते योग्य ठरणार आहे. कोरोनासारख्या महामारीतून आपल्या सर्वांची सुटका करून घेण्यासाठी आणि स्वतःला आणि इतरांना देखील सुरक्षित ठेवण्यासाठी 'लसीकरण' हा एकमेव उपाय असल्याचे तिने सांगितले आहे.
लस घेऊन आपण सुरक्षित झालो आहोत, आता कशाला मास्क हवा असा विचार करणारी लोकं आपल्या आजूबाजूला आहेत, याच लोकांना एक सल्ला देण्यासाठी मोनालिसा बागल हिने सोशल मीडियावर लसीकरणाच्या दरम्यानचा एक फोटो शेअर केला.
यात तिने 'मी लस घेतली आहे. तुम्ही अजून घेतली नसेल तर घ्या आणि सुरक्षित व्हा. जमेल तसं, लवकरात- लवकर लस घ्या आणि लस घेतली असली तरी पण मास्कचा वापर करा.' असे म्हटले आहे.
मोनालिसाने सामाजिक आणि महत्त्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न यातून केला आहे.
हेही वाचलंत का?