प्रियांका चोप्रा 
मनोरंजन

प्रियांका चोप्रा चे ‘या’ अभिनेत्यांच्या बायकांशी होते जोरदार भांडण

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क:  बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे अनेकांशी अफेअर असल्याच्या बातम्या पसरल्या.  सुरुवातीच्या काळात शाहरूख खान, अक्षय कुमार, हरमन बावेजा आणि नंतर शाहीद कपूर यांच्यासोबच्या अनेक चर्चा चवीने केल्या जात होत्या.

अधिक वाचा: 

प्रियांका चोप्रा आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडची ग्लॅमरस हिरोईन ते हॉलिवूडमध्ये वेबसिरीजपर्यंतचा प्रवास वादळी आहे.

अनेक अभिनेत्यांशी प्रियांका चोप्राचे नाव जोडल्यानंतर तिने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले.

मात्र, दोन विवाहित अभिनेत्यांसोबत तिचे नाव जोडले गेल्यानंतर दोघांच्याही बायकांशी तिचे जोरदार भांडण झाले होते.

अधिक वाचा: 

शाहरूख खानशी प्रियांका चोप्रा चे नाते इतके घट्ट होते की दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

अक्षय कुमारच्या पर्सनल स्टाफमधील एका महत्त्वाच्या कर्मचाऱ्याने अनेक खुलासे केले होते. प्रियांका अक्षयच्या किती मागे लागली होती याचे पुरावेच व्हायरल केले होते.

अधिक वाचा: 

इन्कम टॅक्सची धाड पडली आणि प्रियांकाच्या घराचा दरवाजा नाइट सूटमध्ये शाहीद कपूरने उघडला होता. ही बातमी कित्येक दिवस माध्यमांत व्हायरल होत होती.

कुणाच्या घरी इन्कमटॅक्सची धाड पडली तर ती मोठी चर्चेची बातमी होईल, पण प्रियांकाच्या घरी धाड पडली आणि नाइट सूट घातलेला अभिनेता शाहीद कपूर दार उघडायला आला तेव्हा अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.

धाडीपेक्षा नाईट सूटची बातमीच जास्त धुमाकूळ घालत होती.

ट्विकल खन्नाशी जोरदार भांडण

२००४ मध्ये अक्षय कुमार आणि प्रियांका चोपडा ही जोडी ऐतराज या सिनेमात होती. हा सिनेमा खूप गाजला. त्यानंतर या जोडीने अनेक सिनेमे केले. ऐतराजमध्ये तिने निगेटिव्ह रोल केला होता.

बोल्ड दृष्ये आणि अभिनयामुळे ती चर्चेत आली. त्यानंतर तिने अनेक चांगले सिनेमे केले. अंदाज, ऐतराज या सिनेमांनतर प्रियांका आणि अक्षय यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पसंत पडली.

त्यामुळे ऐतराजनंतर या दोघांमधील जवळीक वाढल्याची चर्चा होती. या दोघांत अफेअर असल्याची चर्चा माध्यमांत होती.

ही चर्चा जेव्हा अक्षयची पत्नी ट्विकल खन्ना हिच्यापर्यंत गेली तेव्हा तिने दुर्लक्ष केले. अशा चर्चा होत असल्याचे गृहीत धरून तिने दुर्लक्ष केले.

मात्र, एक दिवस वक्त सिनेमाच्या शुटिंगदरम्यान तिने प्रियांकाला फोन केला आणि दोघींत जोरदार भांडण झाले.

ट्विंकल रागा रागात सेटवर गेली मात्र, तिथे प्रियांका नव्हती. त्यानंतर तिचे अक्षय कुमारशीही जोरदार भांडण झाले.

मात्र, त्यानंतर अक्षय कुमारने तिच्यासोबत काम करायचे नाही यावर सहमती होऊन भांडण मिटले.

त्यानंतर मुझसे शादी करोगे या सिनेमात हे दोघे एकत्र दिसले. त्यानंतर अक्षयची वाट वेगळी झाली. मध्यंतरी अक्षयच्या पर्सनल स्टाफमधील एकाने प्रियांका अक्षय कुमारच्या किती मागे लागली होती याबाबत धक्कादायक खुलासे केले होते.

शाहरूख खान करणार होता लग्न पण…

शाहरूख खान आणि प्रियांकाने 'डॉन' या सिनेमात काम केले होते. या शुटिंगदरम्यान ते दोघेही एकत्र आले. तत्पुर्वी शाहरूखची पत्नी गौरी खान हिच्या जवळच्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये प्रियांकाचा समावेश होता. त्‍या अनेक पार्टींना जात होत्या.

मात्र, डॉनच्या शुटिंगदरम्यान शाहरूख आणि प्रियांका यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि प्रकरण लग्नार्पंत गेले होते.

गौरी खानने केली कानउघडणी

ही बातमी गौरी खानला लागली आणि तिने याचा जाब प्रियांकाला विचारला. शाहरूख खानलाही तिने तंबी दिली आणि प्रकरण थांबले.

गौरी खानच्या फ्रेंड लिस्टमधून तिचा पत्ता कायमचा कट झाला. गौरी खानने तिचा सेलिब्रेटी पार्ट्यांना बोलवणे बंद केले.

नाईट सूटमध्ये शाहीद कपूरने उघडले दार…

कमीने या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान प्रियांका आणि शाहीद यांच्यात सूत जुळले. या दोघांच्या अफेअरची जोरात चर्चा होती.

एक दिवस इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी प्रियांकाच्या घरावर भल्या पहाटे धाड टाकली. त्यानंतर दार उघडण्यासाठी आला तो शाहीद कपूर. तोही चक्क नाईट सूटमध्ये. त्याला पाहताच अधिकारीही गडबडले.

या घटनेची माहिती माध्यमांमध्ये आल्यानंतर बरीच चर्चा झडली. पुढे प्रियांकाने असा खुलासा केला की, धाड पडल्यावर मी खूप घाबरले होते. त्यामुळे शेजारीच असलेल्या शाहीद कपूरला बोलावून घेतले होते.

मात्र, शाहीद धाड पडण्यापूर्वीच ताे तेथे होता. पुढे या प्रकरणाची इतकी चर्चा सुरू झाली की, तेव्हापासून प्रियांका शाहीदला टाळू लागली.

कामात व्यस्त असल्याचे कारण देऊन टाळणे सुरू झाल्यावर शाहीदने आपल्या मित्रांना तिच्यावर पाळत ठेवायला सांगितली. मात्र, त्यांनी नकार दिला अखेर प्रियांका राहत असलेल्या बिल्डिंगमधील एका व्यक्तीने शाहीदला माहिती दिली.

त्यावेळी त्याला धक्का बसला कारण प्रियांकाचे दुसऱ्या एकाबरोबर अफेअर असल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे होते.

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: समांतर २ मधील तेजस्विनी पंडितशी गप्पा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT