मनोरंजन

दृश्यम फेम इशिता दत्ता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची आहे पत्नी

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमध्ये दृश्यममध्ये अजय देवगनच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका अभिनेत्री इशिता दत्ता हिने साकारली होती. आपल्या उत्तम अभिनयाने आणि अदाकारीने तिने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. इशिता दत्ता हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाढदिवसाच्या या फोटोत इशितासोबत पती वत्सल सेठ दिसत आहे. इशिताला यावेळी खास सरप्राईज मिळाले आहे. वत्सल यांनी काही मोजक्याच मित्रमंडळीसोबत एका पार्टाचे आयोजन केले होते. यावेळी इशिताने सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी खूपसाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

इशिताने इंस्टाग्रामवर नेहमी आपले हॉट फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इशिता दत्ता अभिनेत्री तनुश्री दत्ताची छोटी बहिण आहे. इशिता दत्ता 'द गर्ल ऑन द ट्रेन' आणि कपिल शर्मासोबतच्या 'फिरंगी' चित्रपटाही झळकली होती.

याशिवाय इशिताने 'एक घर बनाऊंगा', 'बेपनाह प्यार है' या मालिकेतून प्रकाश झोताता आली. 'रिश्तों का सौदागर- बाजीगर' आणि 'झलक दिखला जा' या डान्स रिऍलिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. परंतु, अल्पावधीतच तिला करिअरमधून ब्रेक मिळाला. यानंतर तिने अभिनेता वत्सल सेठसोबत विवाह बंधनात अडकली.

कोण आहे वत्सल सेठ

इशिता दत्ताने २८ नोव्हेंबर २०१७ मध्ये वत्सल सेठशी विवाह केला. वत्सल सेठने 'टारझन द वंडर कार' या चित्रपटातून प्रकाश झोताता आला होता. विशेष करून या विवाहाची कुठेच चर्चा होवू नये यासाठी काळजी घेतली गेली होती. वत्सल सेठ हा इशितापेक्षा वयाने १० वर्षांनी मोठा आहे.

इशिता आणि वत्सल 'रिश्तों का सौदागर-बाजीगर' या मालिकेतमध्ये एकत्रित काम केलं होतं. तेव्हापासून ते एकमेंकांना डेट करत होते.
मध्यंतरी इशिता प्रेग्नंट असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. परंतु, इशिता याबाबतचा खुलासा केला होता.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT