मनोरंजन

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर येतोय ‘मुंबईचा नवरा’

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'यो यो मुंबईचा पावणा आलाय कोलीवाऱ्यान, दाढी मिशी करून यो बगतोय तोऱ्यान…..' असे धमाल शब्द असलेला 'मुंबईचा नवरा' हा नवा म्युझिक व्हिडिओ खास गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता आशय कुलकर्णी आणि सिद्धी तुरे ही नवी जोडी या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे.

सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ शुक्रवार (दि. ३ सप्टेंबर) रोजी चाबत्यांना पाहता येणार आहे.

साईनाथ राजाध्यक्ष यांनी निर्मिती केलेल्या मुंबईचा पावणा या म्युझिक व्हिडिओच्या बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. दर्शन दीपक नांदगावकर यांनी या म्युझिक व्हिडिओच्या गाण्याचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे.

आशय कुलकर्णी हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'माझा होशील ना', 'किती सांगायचंय मला', 'पाहिले न मी तुला' अशा मालिकांतून आशय कुलकर्णी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तर सिद्धी तुरे याने आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत.

सिध्दीने गायलेली कोळी गीते खुपच लोकप्रिय झाली आहेत. त्यातील सप्तसूर म्युझिकने काही गाणी प्रदर्शित केली आहेत. यात 'वसईच्या नाक्यावर येशील का…' हे गाण्याने चाहत्यांना भारावून सोडले आहे. सिध्दीसोबत रितू मापारेही यात असून अंकित शिंदे आणि दिव्या घाग कार्यकारी निर्माते आहेत. तर अमोल गोळे यानी छायांकन केले आहे.

प्रितेश सुर्वे आणि पायल पिसाट यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. देवबागच्या निसर्गरम्य परिसरात हा म्युझिक व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे.

आशय आणि सिद्धीची फ्रेश जोडी

कोळी-आगरी बोलीभाषा, धमाल गीत-संगीत, आशय आणि सिद्धीची फ्रेश जोडी, उत्तम छायांकन या सगळ्यामुळे म्युझिक व्हिडिओ प्रेक्षणीय झाला आहे. खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'मुंबईचा नवरा' व्हिडिओ चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT