शिल्पा शेट्टी 
मनोरंजन

‘एवढा पैसा कमवून तुला ब्लाऊज घालता येत नाही का?’ (video)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिल्पा शेट्टी बॉलीवूड इंडस्ट्रीच्या सर्वात फिट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये मोजली जाते. तिच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचा परिणाम अजिबात जाणवत नाही.

सध्या शिल्पा शेट्टी तिच्या आगामी 'हंगामा 2' चित्रपटामुळे चर्चेत होती. शिल्पा शेट्टी बऱ्याच दिवसानंतर मोठ्या पडद्यावर परतली.
मात्र, नवरा राज कुंद्रा पोर्न फिल्म रॅकेटमध्ये शिल्पा चांगलीच अडचणीत आली आहे. राज सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

राज कुंद्रावर अनेक मॉडेल्सकडून गंभीर आरोप करण्यात आल्याने चांगलीच अडचण वाढली आहे. नवरा कायदेशीर कचाट्यात सापडल्याने शिल्पाने आपले सगळे कार्यक्रम थांबवले आहेत. तिचीही चौकशी करण्यात आली आहे.

कपड्यावरून झाली होती ट्रोल

शिल्प शेट्टी तसेच जावेद जाफरीचा मुलगा मीझान जाफरी, परेश रावल आणि प्रणीता सुभाषही 'हंगामा 2' मध्ये दिसणार आहेत.

हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शिल्पा शेट्टी 'हंगामा 2'च्या प्रमोशनसाठी पोहोचली होती, तेव्हा सर्वांचे लक्ष तिच्यावर होते. त्या ठिकाणी ती अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये अवतरली होती.

'हंगामा 2' च्या प्रमोशनसाठी पोहोचलेली शिल्पा शेट्टी येथे बरगंडी कलर क्रॉप टॉप आणि लाँग ब्राऊन कलरच्या लेदर स्कर्टमध्ये दिसली. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान घातलेला हा ड्रेस काही जणांना पसंत पडला, तर बर्‍याच लोकांना तो अजिबात आवडला नाही.

अनेक लोक शिल्पा शेट्टीची तुलना किम कार्दशियानशीही करू लागले. यावर कमेंट करताना यूझर्सनी शिल्पा शेट्टीला बॉलिवूडची किम कर्दाशियन म्हणून ट्रोल केले.

शिल्पा शेट्टीच्या लूकवर भाष्य करताना एका युझर्सने लिहिले की, 'बॉलिवूडची किम कर्दाशियन.' दुसर्‍याने लिहिले- ब्लाउज घालायला विसरली.

कपड्यांविषयी भाष्य करताना एका युझर्सने इतके पैसे मिळूनही हे लोक कपड्यांशिवाय फिरतात.

त्याचबरोबर मीजान जाफरीबरोबर विनोद केल्याबद्दल काही युझर्स शिल्पा शेट्टीला ट्रोल देखील करत आहेत.

वास्तविक, प्रमोशन इव्हेंटच्या वेळी शिल्पा मीझान जाफरीबरोबर विनोद करताना दिसली.

ते काही युझर्सना आवडले नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला अहंकारीही म्हटले. त्याचबरोबर मास्क न घातल्यानेही शिल्पा ट्रोल झाली.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT