मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आपला बॉयफ्रेंड विक्की जैनचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त अंकिताने विक्कीला खास असे गिफ्ट दिले आहे. अंकिता लोखंडे हिने स्वत: याची माहिती सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दिली.
अंकिताने बॉयफ्रेंड विक्की जैनचा काल (दि.१ ऑगस्ट) रोजी वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अंकिताने विक्कीला खास भेट देऊन आश्चर्यचकित केले. याचा एक व्डिडिओ अंकिताने इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी अंकिताने जॉगर्स आणि हुडी घातली होती.
या व्डिडिओ अंकिता विक्कीच्या घरात जावून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसली. ती विक्कीच्या पाढीमागे जावून उभी राहून त्याला पाढीमागे फिरण्यास सांगते.
विक्की पाढीमागे फिरल्यानंतर अकिंताने विकीला शुभेच्छा देत स्मार्ट हेडफोन सेट गिफ्ट दिला. यानंतर विक्कीने अंकिता हग करत किस केले.
हा व्हिडिओ शेअर करताना अंकिता लोखंडेने लिहिले की, 'तुमची चांगली वर्षे तुमच्या पुढे आहेत आणि सर्वोत्तम वर्षे सध्या माझ्यासोबत आहेत आणि मी वचन देते की, आयुष्याच्या प्रत्येक चढ -उतारात मी नेहमीच तुमच्यासोबत राहीन. माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूपच शुभेच्छा.'
हा व्हिडिओ शेअर होताच अनेक मराठी स्टार्ससोबत चाहत्यांनी विक्कीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, दलजीत कौर, किश्वर मर्चेन्टसोबत अनेक स्टार्स आहेत.
अंकिताने विक्किसोबतचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गेल्या जून महिन्यात एक फोटो शेअर करताना अंकिताने लिहिले होते की, 'भविष्यात घडलेल्या घटना आणि निराशेत असल्याने मला पुन्हा प्रेम मिळणार नाही असे मला वाटत होते. परंतु, मग तू भेटलास. तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि आम्ही प्रेमात पडलो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.'
अंकिता लोखंडे अभिनेता सुशांत सिंह राजपूतला अनेक दिवसांपासून डेट करत होती. परंतु, त्याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता निराशेत गेले होती. यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला.
हेही वाचलंत का?