YouTube Paying Creators Netflix Deal: प्रसिद्ध चॅनल्सना युट्यूब त्यांचे एक्सक्लुजीव व्हिडिओ त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर काही काळासाठी अपलोड करण्यासाठी लाखो डॉलर्स देत आहेत. नेटफ्लिक्स इंडियाने मोठमोठ्या युट्यूब स्टार्सना घेण्याची जी मोहीम सुरू केली आहे त्याला ब्रेक लावण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत असं जाणकारांनी सांगितलं आहे.
आता युट्यूब थेट या प्रोग्राम्सना फायनान्सिंग करण्याबाबत चर्चा करत आहे. तसेच मोठ्या ब्रँड डील्समध्ये क्रिएटर्सना काही भाग अलोट करण्याची ऑफर दिली आहे. युट्यूबने अजूनपर्यंत कोणत्या क्रिकेटर्ससोबत डील पूर्ण केलेली नाही. मात्र अनेक पार्टनसोबत ते एका कराराच्या जवळ पोहचले आहेत असं यातील जाणकार लोकांनी सांगितलं आहे. या लोकांनी ही माहिती आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे कारण अजून वाटाघाटी सुरू असून हा खूप संवेदनशील विषय आहे.
जे युट्यूब क्रिएटर नेटफ्लिक्स सोबत डील करणार आहेत त्यांना परिणामांना सामोर जावं लागणार आहे असं देखील युट्यूबने सांगितल्याचं ही जाणकार मंडळी सांगत आहेत. जर त्यांनी त्यांचे व्हिडिओ नेटफ्लिक्सवर त्याचवेळी रिलीज केले तर युट्यूब हे त्यांचे मार्केटिंग कॅम्पेन किंवा इव्हेंट फार फिचर करणार नाही.
युट्यूब त्यांच्या मेजर ब्रँड कॅम्पेन्सकडून जे क्रिएटर्स शेअर मिळवतात आणि ते नेटफ्लिक्स सोबत देखील काम करत आहेत त्यांना यातून वगळण्याची शक्यता आहे.
नेटफ्लिक्स सध्या अनेक मुख्य युट्यूबर्ससोबत करार करण्यासाठी आग्रही रणनिती आखत आहे. ते अॅलन चाऊ आणि निक डिजिओवानी यांना त्यांचे व्हिडिओ युट्यूब आणि नेटफ्लिक्सवर एकाचवेळी पोस्ट करण्यासाठी पैसे देत आहे.
नेटफ्लिक्स हे अनेक युट्यूब क्रिएटर्स, चॅनल आणि प्रोग्राम्स सोबत सध्या बोलणी करत आहे. याच हॉट वन्स, सेलिब्रिटी टॉक शो सारख्या प्रोग्रामचा समावेश आहे.
नेटफ्लिक्सची डील ही क्रिएटर्ससाठी अतिरिक्त लाखो डॉलर्स कमवण्याची नामी संधी आहे. यामुळे त्यांचे व्हिडिओ नव्या व्ह्युवर्सपर्यंत पोहचणार आहेत. नेटफ्लिक्सकडे जवळपास ३२५ मिलियन सब्सक्राइबर आहेत.
युट्यूब त्यांच्या क्रिएटर्सना त्यांचे व्हिडिओ युट्यूब आणि नेटफ्लिक्सवर क्रॉसपोस्ट करण्यामुळे युट्यूबची व्ह्युवरशिपवर परिणाम होणार असल्याचं सांगत आहेत. युट्यूबने हे सर्व आपल्या प्रमुख क्रिएटर्स आणि चॅनल्सना सांगितलं असून अनेक क्रिएटर्सनी नेटफ्लिक्स सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. युट्यूबने त्यांच्या क्रिएटर्सना काही विशिष्ट ब्रँड्सचे स्पॉन्सरशिप देखील व्हिडिओमधून हटवण्यास सांगितले आहे.