मनोरंजन

Panchayat 2: पालकांना खोटं बोलून मुंबईत आलेल्या सान्विकाचं पुढं काय झालं?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

'पंचायत 2' (Panchayat 2) वेब सीरीजमध्ये रिंकीच्या भूमिकेने प्रेक्षकांवर गारुड केले आहे. आता सान्विकाने सांगितलं आहे की, तिला 'पंचायत'मध्ये रिंकीची भूमिका कशी मिळाली? पालकांना खोटं बोलून मुंबईत आलेल्या सान्विकाचं पुढं काय झालं? जाणून घेऊया तिच्याविषयी…(Panchayat 2 )

वेब सीरीज 'पंचायत 2'मध्ये रिंकीच्या भूमिकेमुळे सान्विका (Sanvikaa) ने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केलीय. सीरीजमध्ये तिच्या कामाचं खऊ कौतुक होत आहे. इतकचं नाही, तर सान्विका आता नॅशनल क्रश झालीय. सोशल मीडियावर लोक तिला लग्नासाठी प्रपोज करत आहेत.

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे जन्मलेली सान्विकाने तिचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर ती बंगळुरूला शिफ्ट झाली. मात्र, इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचे नाही, असे तिने सुरुवातीपासूनच ठरवले होते. सान्विकाने एका मुलाखतीत सांगितले  हाेते की, तिला 'पंचायत'मध्ये रिंकीची भूमिका कशी मिळाली होती.

मी पालकांशी खोटे बोलले

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या वृत्तानुसार, सान्विका म्हणाली, 'मी माझ्या पालकांना सांगितले की, मी नोकरीसाठी बंगळुरूला जात आहे. पण, मी त्यांच्याशी खोटे बोलले. ९ ते ५ नोकरी करणे हे माझे ध्येय कधीच नव्हते. मी माझे पर्याय खुले ठेवले. काही महिन्यांनी मी मुंबईला शिफ्ट झाले आणि सहाय्यक दिग्दर्शक (वेशभूषा) झाले. काही जाहिरातींच्या चित्रपटांसाठी शूटिंग करत असताना मी अभिनयात हात आजमावण्याचा विचार केला. ऑडिशन द्यायला सुरुवात केली. मी काही ऑडिशन्स दिल्या आणि जाहिरात चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

मी नोकरी करावी अशी आई-वडिलांची इच्छा

सान्विकाने सांगितले की, तिने एखादी नोकरी करावी अशी तिच्या पालकांची इच्छा होती. ती म्हणाली, 'ते (पालक) मला नोकरीच्या जाहिराती आणि रोजगाराच्या बातम्यांच्या लिंक पाठवायचे. मी  नोकऱ्यांसाठी अर्ज करावा, अशी त्यांची इच्छा होती. सुदैवाने त्याने मला लग्न करण्यास सांगितले नाही. त्यांनी मला माझे करिअर करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते.

अशी मिळाली रिंकीची भूमिका

ती म्हणाली, 'मी एका जाहिरात चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले होते. तिथे एक माणूस माझ्याकडे आला. मला टीव्हीमधील एका पात्रासाठी स्क्रीन टेस्ट करण्यास सांगितले. ते पंचायतसाठी आहे हे मला माहीत नव्हते. सुदैवाने मला मालिकेत भूमिका मिळाली. त्याने मला सांगितले की, पहिल्या सीझनमध्ये तुझी छोटी भूमिका असेल; पण दुसऱ्या सीझनमध्ये तुझी भूमिका पुढे नेली जाईल.

नीना आणि रघुबीर यांनी खूप साथ दिली

सान्विका म्हणाली, 'सुरुवातीला मी खूप घाबरले होते. मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागले नाही तर काय होईल असा विचार करू लागले? मला नीनाजी आणि रघुबीर सरांसोबत काम करायचे होते. ते खूप कठीण होते. मात्र, त्यांनी मला खूप साथ दिली. माझी कामगिरी वाढवण्यासाठी तो क्रिएटिव्ह इनपुट देत असे. त्यांनी मला नेहमीच कुटुंबासारखे वागवले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT