Vishnu Bhagnani On David Dhawan pudhari
मनोरंजन

Vishnu Bhagnani On David Dhawan: 'चुनरी चुनरी' गाण्यावरून विष्णू भगनानींचा डेव्हिड धवन यांच्यावर गंभीर आरोप; थेट कोर्टात धाव!

Anirudha Sankpal

Vishnu Bhagnani slams David Dhawan over illegal recreation: वरिष्ठ निर्माते विष्णू भनगानी यांनी शुक्रवारी डेव्हिड धवन यांच्यावर टीका करत त्यांनी भगनानी यांचे चुनरी चुनरी हे गाणे त्यांना न विचारता पुन्हा त्यांच्या मुलाच्या चित्रपटात कसं वापरलं असा सवाल केला आहे. वरूण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे स्टारर 'है जवानी तो इश्क होना है' याच चित्रपटात पुन्हा एकदा चुनरी चुनरी गाणे रिक्रिएट करण्यात आले होते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते. तर या चित्रपटात टिप्स कंपनीच्या रमेश तौराणी यांचे देखील बॅकिंग होते. विष्णू यांनी २०२० मध्ये कूली नंबर १ चित्रपटावेळी आर्थिक नुकसान झाल्याचे देखील सांगितले. त्यांनी डेव्हिड किंवा वरूण धवन यांच्याकडून याबाबत चकार शब्द देखील काढण्यात आला नाही असा देखील दावा केला आहे.

डेव्हिड धवन यांना ७० कोटी रूपये दिले होते

व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्समध्ये काही ठराविक पत्रकारांसमोर बोलताना विष्णू भगनानी म्हणाले, 'मी डेव्हिडजींना सांगितलं होतं की मला बिवी नंबर १ चित्रपट तयार करतायचा आहे. त्यापूर्वी २०२० मध्ये कूली नंबर १ च्या रिमेकमध्ये आम्हाला २७ कोटी रूपयांचा लॉस झाला होता. त्यावेळी मी फक्त नामधारी निर्माता होतो. निर्मिती आणि त्याचा खर्च १०० टक्के डेव्हिड जी पाहात होते. मी हा चित्रपट तयार करण्यासाठी डेव्हिड जींना ७० कोटी रूपये दिले होते.

भगनानी पुढे म्हणाले, 'तो कोव्हिडचा काळ होता. त्यावेळी डेव्हिड जींनी सांगितले होते की तुमचे जे काही नुकसान झाले आहे. भविष्यात आपण त्याची काळजी घेऊन. आता बिवी नंबर १ सुरू करूयात. याप्रमाणे आम्ही बिवी नंबर १ वर सहा महिने काम केले. एकेदिवशी रोहित धवन यांनी मला सांगितंल की स्क्रीप्ट अजून तयार नाही. मी म्हटलं स्कीप्ट हे क्रिएटिव्ह काम आहे. मी घाई न करण्याचा निर्णय घेतला.'

चुनरी चुनरी गाण्यावरून वाद

'पुढे तीन महिन्यानंतर मला कळालं की रमेश तौराणी आणि डेव्हिड धवन यांनी बिवी नंबर १ चित्रपट तयार करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. मला वाईट वाटलं. मात्र तो त्यांचा निर्णय म्हणून मी सोडून दिलं. मात्र एका वर्षानंतर मी पाहिलं की चुनरी चुनरी हे गाणं त्या चित्रपटात आहे. मी डेव्हिड धवन यांना फोन केला आणि त्यांना तुम्ही असं कसं करू शकता असं विचारलं?'

विष्णू भगनानी यांनी पुढे सांगितलं की, 'आम्ही रिलीजच्यावेळी बिवी नंबर १ चे ऑडिओ राईट्स टिप्सला विकले होते. ते आता बदमाशी करून हे गाणे चालवत आहेत. ते या विषयी आमच्याशी भेटण्यास देखील तयार नाहीत. आम्ही ते पत्र कोर्टात सादर केलं आहे. त्यामुळं त्यांनी जैसे थे स्थिती ग्रँट केली.

किमान मला कॉल करायला हवा होता..

डेव्हिड धवन हे आमच्या चित्रपटातील गाणं हे त्यांच्या मुलाच्या चित्रपटात कसे वापरू शकतात. तेही रमेश तौराणी हे निर्माते अताना. इंडस्ट्रीमध्ये काही इथिक्स असायला हवेत. मान्य आहे की रमेश तौराणी यांनी तुम्हाला पैसे दिले आहेत. मात्र तुम्ही माझ्या प्रोडक्शनमधील सेम गाणं रिक्रिएट करू शकत नाही. निदान तुम्ही मला कॉल करायला हवा होता आणि सांगायला हवं होतं की विष्णूजी मी सेम गाणे माझ्या मुलासाठी करत आहे. मला आशा आहे की तुम्हाला काही आक्षेप नाही. कृपा करून पाठिंबा द्या. मी त्यांना एनओसी दिली असती आणि मला काही वाटलं नसतं.'

प्रेस कॉन्फरन्सवेळी विष्णू भगनानी यांनी कूली नंबर १ चित्रपटावेळी झालेल्या नुकसानीबाबत देखील वक्तव्य केलं. कूली नंबर वन चा रिमेक देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. भगनानी म्हणाले की, 'मला कूली नंबर १ चित्रपटावेळी २७ कोटींचे नुकसान झाले होते. वरूण धवनला काकांचे झालेले नुसकान कोण भरून काढणार याबाबत काही चिंता नव्हती.

कायदेशीर भांडण

पूजा एन्टरटेनमेंटने टिप्स इंडस्ट्रीवर चुनरी चुनरी या गाण्याचा है जवानी तो इश्क होगा या चित्रपटात बेकायदेशीररित्या वापर केल्याचा आरोप केला आहे. हा चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. हे गाणे १९९९ मध्ये आलेल्या बिवी नंबर १ चित्रपटातील आहे. या चित्रपटाची पूजा एन्टरटेनमेंटने निर्मिती केली होती. या प्रकरणी पहिरामधील कटिहार कोर्टाने जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT