Bollywood News : कर्ज काढून सलमानने वडिलांसाठी घेतलं रोलेक्स; सलीम खान म्हणाले, “स्वतःला राजा समजतोस का ?”

महागड्या गिफ्टवरून सलीम खान सलमानवर झाले नाराज, त्‍यांनी सलमानला चांगलंच सुनावलं
कर्ज काढून सलमानने वडिलांसाठी घेतलं रोलेक्स; सलीम खान म्हणाले, “स्वतःला राजा समजतोस का ?”
कर्ज काढून सलमानने वडिलांसाठी घेतलं रोलेक्स; सलीम खान म्हणाले, “स्वतःला राजा समजतोस का ?”file photo
Published on
Updated on

bollywood salman khan took loan 9 lakh rupees rolex gift father salim khan first expensive present

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सलमान खान आपल्या वडिलांचा, म्हणजेच सलीम खान यांचा प्रचंड आदर करतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, कमाई सुरू केल्यानंतर त्याने वडिलांना सर्वात महागडी भेटवस्तू दिली होती. मात्र ती पाहून सलीम खान नाराज झाले होते.

कर्ज काढून सलमानने वडिलांसाठी घेतलं रोलेक्स; सलीम खान म्हणाले, “स्वतःला राजा समजतोस का ?”
Yash struggle story | दिवसाला ५०० रुपये कमावणारा यश आज करोडोंचा सुपरस्टार; सांगितला संघर्षाचा थरारक प्रवास

बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्समध्ये सलमान खानची गणना होते. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी कोट्यवधी चाहते थिएटरमध्ये गर्दी करतात. त्याचे सिनेमे सहज १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात. गेल्या ३५ वर्षांच्या मेहनतीमुळे सलमानला हे यश मिळालं आहे.

सलमान एका चित्रपटातून भरघोस मानधन कमावत असला, तरी तो आजही आपली कमाई वडील सलीम खान यांच्याकडेच देतो. याचा खुलासा त्याने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. सलमानने नेहमीच आपल्या कुटुंबाला स्वतःपेक्षा अधिक महत्त्व दिलं आहे. म्हणूनच तो आजही आई-वडिलांसोबत त्याच अपार्टमेंटमध्ये राहतो.

कर्ज काढून सलमानने वडिलांसाठी घेतलं रोलेक्स; सलीम खान म्हणाले, “स्वतःला राजा समजतोस का ?”
Mission Katakasar | मिशन काटकसर

सलमानने घेतलं होतं महागडं घड्याळ

अलीकडेच ‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सलमानने आपल्या पहिल्या सर्वात महागड्या भेटीचा उल्लेख केला. ही भेट त्याने वडील सलीम खान यांच्यासाठी घेतली होती. सलमानने सांगितलं की, ९०च्या दशकात कमाई सुरू झाल्यानंतर तो कर्ज काढून महागडं रोलेक्स घड्याळ घेण्यासाठी गेला होता. त्या घड्याळाची किंमत सुमारे ९ लाख रुपये होती. त्यापैकी ५ लाख रुपये त्याने उधार घेतले होते.

सलमान म्हणाला, “मी सर्वात पहिली महागडी वस्तू माझ्या डॅडसाठी रोलेक्स घड्याळ घेतलं होतं. नंतर मी पुन्हा घड्याळं वापरायला सुरुवात केली तेव्हा डॅडने ते घड्याळ मला परत दिलं. तेव्हा माझ्याकडे पूर्ण पैसे नव्हते, तरीही मला ते घड्याळ त्यांच्यासाठी खूप आवडलं होतं.”

तो पुढे म्हणाला, “त्या काळात त्या घड्याळाची किंमत जवळपास ९ लाख रुपये होती. माझ्याकडे फक्त ४ लाख रुपये होते, उरलेले पैसे मी कर्जाने घेतले. जेव्हा मी डॅडला ते घड्याळ दिलं, तेव्हा त्यांनी मला विचारलं, ‘अजून नीट काम सुरूही केलं नाही आणि हे सगळं काय? स्वतःला राजा समजतोस का?’ सुरुवातीला त्यांना हे घड्याळ घेणं अजिबात पसंत नव्हतं. पण नंतर ते त्याला दागिना म्हणू लागले. मी घड्याळं घालायला लागल्यानंतर त्यांनी ते मला परत दिलं.”

सलमान कोणतं घड्याळ वापरतो?

सलमानने सांगितलं की, गेल्या ३० वर्षांपासून त्याने स्वतः घड्याळ घालणं जवळपास बंद केलं आहे. सोशल मीडियावर तो ज्या घड्याळांसह दिसतो, ती बहुतेक त्याच्या मित्रांची असतात. काही वेळ घालून तो ती परत करतो. त्याच्याकडे फक्त तेच रोलेक्स घड्याळ आहे, जे त्याने वडिलांना भेट दिलं होतं.

सलमानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास, सध्या तो दिग्दर्शक वामसी पैद्दीपल्ली यांच्यासोबत नव्या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. त्यानंतर तो राज अँड डीके यांच्या सुपरहिरो चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. तसेच अपूर्व लाखिया यांच्यासोबतचा ‘मातृभूमी’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news