मनोरंजन

Khatron Ke Khiladi 12 : रुबीना ‘दिलैक खतरों के खिलाडी’तून बाहेर?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध शो खतरों के खिलाडी-१२ मधून टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक (Khatron Ke Khiladi 12) बाहेर पडली आहे. अभिनेत्री रुबिना दिलैकला 'बॉस लेडी' म्हटले जाते. सध्या ती 'खतरों के खिलाडी-१२' साठी केपटाऊन, दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. रुबिना टीव्हीचा प्रसिध्द चेहरा आहे. तसेच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अभिनेत्रीने केपटाऊनमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. रुबिनाने 'खतरों के खिलाडी-१२' ची ट्रॉफी जिंकावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान, रुबिनाने सोशल मीडियावर एक ट्विट केले, जे पाहून प्रत्येकजण ती रोहित शेट्टीच्या शोमधून बाहेर पडली की काय असे तर्क लावले जात आहेत. (Khatron Ke Khiladi 12)

रुबिनाचे ट्विट पाहून चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. नुकतेच रुबीनाने ट्विट केले आणि लिहिले की, "बेईमानीने जिंकणे आणि प्रामाणिकपणे हरणे… तुम्ही कोणाची निवड कराल? रुबिनाचे हे ट्विट पाहिल्यानंतर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले – ती खतरों के खिलाडी १२ मधून बाहेर झाली आहे, पण असे कसे होऊ शकते, ती चॅनलचा चेहरा आहे.

दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने लिहिले की, कृपया रुबीना खतरों के खिलाडी-१२ (खतरों के खिलाडी 12) च्या प्रवासाचा आनंद घ्या, तुम्ही जिंकलात किंवा हरलात तरी आम्हाला काही फरक पडत नाही. केपटाऊनमध्ये स्टंट करताना फक्त तुमचे सर्वोत्तम द्या. आणखी एका युजरने लिहिले – मला माझे उत्तर मिळाले आहे. खतरों के खिलाडी-१२ मधून आणखी एक स्पर्धक बाहेर पडला आहे. रुबीना बिग बॉस १४ ची विजेती झाली होती. त्यामुळे तिचे चाहते खतरों के खिलाडी -१२ ची ही विजेती व्हावी, अशी अपेक्षा करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT