मनोरंजन

Sunny Leone : सनीच्या लग्‍नाचा अकरावा वाढदिवस

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन :

कॅनेडियन पोर्नस्टार ते बॉलीवूड अभिनेत्री असा प्रवास केलेल्या सनी लियॉनने आता आपली एक नवी ओळख निर्माण केलेली आहे. तीन अपत्यांची आई असलेल्या सनीच्या लग्‍नाला आता अकरा वर्षे झाली आहेत. सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर बॉलीवूडमधील प्रसिद्ध दाम्पत्यांपैकी एक आहेत.

लग्‍नाच्या वाढदिवसानिमित्त सनीने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. लग्‍नातील एक फोटो शेअर करून तिने म्हटले की आज आमच्या लग्‍नाला अकरा वर्षे झाली. तो असा काळ होता ज्यावेळी आमच्याकडे पैसे नव्हते आणि लग्‍नात 50 पेक्षाही कमी पाहुणे आले होते. लग्‍नाच्या रिसेप्शनचा खर्च आम्ही लोकांनी आहेर म्हणून दिलेल्या पैशाच्या पाकिटांमधून केला होता. फुलांची व्यवस्था बेकार होती, पाहुणे मंडळी दारूच्या नशेत वाटेल ते बडबडत होते आणि आमच्या लग्‍नाचा केकही खराब होता!

आम्ही दोघे आता किती दूरवर निघून आलो आहोत हे दर्शवणार्‍या या 'रिमायंडर' गोष्टी आहेत. आमच्या एकमेकांवरील प्रेमाशिवाय हे शक्य नव्हते. मला माझ्या लग्‍नाच्या कहाणीविषयी प्रेम आहे, कारण ते खास आमच्याच शैलीतील होते! हॅप्पी अ‍ॅनिव्हर्सरी बेबी!!

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT