Sunny Deol paparazzi anger Dharmendra health update: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता ते घरी परतले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी जवळचे लोक आणि अनेक कलाकार घरी भेट देत आहेत.
धर्मेंद्र यांच्या घराबाहेर या काही दिवसांत माध्यमांच्या प्रतिनिधींची (पॅपराझी) मोठी गर्दी झाली आहे. सकाळी समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अभिनेता सनी देओल घराबाहेर येताच प्रचंड संतापलेला दिसला. त्याने माध्यमांच्या प्रतिनिधींवर आपला राग व्यक्त करत कडक शब्दांत सुनावले.
व्हिडिओमध्ये सनी देओल घराबाहेर येतो आणि समोर कॅमेरे पाहताच तो चिडतो. रागात त्याने पॅपराझींकडे पाहून म्हटलं, “तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या घरी आई-वडील, मुले नाहीत का? तुम्ही अजूनही व्हिडिओ काढताय!” हे बोलताना त्यांनी हात जोडले आणि माध्यमांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग आणि वडील धर्मेंद्र यांच्या तब्बेतीची काळजी दोन्ही स्पष्ट दिसत होते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी सनी देओलच्या संताप योग्य असल्याच म्हटलं आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, “ते बरोबर आहेत! इतक्या गंभीर परिस्थितीत कोणाच्या घराबाहेर गर्दी करणं म्हणजे प्रायव्हसीचा भंगच आहे.” दुसऱ्याने म्हटलं, “कोणालाही अशा परिस्थितीत राग येईलच.” आणखी एका यूजरने लिहिलं, “अगोदर अफवा पसरवतात आणि नंतर त्यांच्या घराबाहेर थांबून त्रास देतात. हे चुकीचं आहे.”
10 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि कुटुंबीय दोघेही घाबरले होते. बॉलिवूडचे तीन खान, सलमान, शाहरुख आणि आमिर खान, धर्मेंद्र यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या, ज्यात त्यांच्या निधनाच्या बातम्याही होत्या. त्यावर पत्नी हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त केला आणि सांगितले की धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. मुलगी ईशा देओल हिनेही सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत सांगितले की “वडील आता ठीक आहेत आणि लवकरच पूर्ण बरे होतील.”