

रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची भेट घेतली. दोघांची भेट भावनिक ठरली असून, त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फॅन्सनी “जय-वीरू पुन्हा एकत्र” असं म्हणत शुभेच्छा दिल्या.
मुंबई - बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज झालेले अभिनेते धर्मेंद्र यांची घरी जाऊन भेट घेतली. दोघांची ही भेट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचताना दिसतात.
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी एकत्र अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केलं आहे, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे ‘शोले’ (१९७५). जय आणि वीरूची ही जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही डॉक्टर तपासणीसाठी त्यांच्या घरी पोहोचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. शिवाय असित मोदी यांनी देखील धर्मेंद्र यांची भेट घेतली.
सूत्रांनुसार, त्यांच्या घरी एक आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आलीय. चार नर्स आणि एक डॉक्टर त्यांच्या देखभालीसाठी उपस्थित राहतील. अमिताभ बच्चन स्वत: आपली कार चालवत आले.
(video-viralbhayani instagram वरून साभार)
महानायक येताच पापराझींची गर्दी झाली. बिग बी ८३ वर्षांचे आहेत. आपल्या मित्राला भेटण्यासाठी ते स्वत: आपली कार चालवत धर्मेंद्र यांच्या घरापर्यंत आले.
धर्मेंद्र यांना आज मिळाला डिस्चार्ज
आज बुधवारी सकाळी धर्मेंद्र यांच्या आरोग्याबाबत अपडेट शेअर करण्यात आला. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. प्रतित समदानी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "धर्मेंद्र यांना सकाळी जवळपास साडे सात वाजता डिस्चार्ज मिळाला. त्यांच्यावर घरीच उपचार केले जातील. कारण त्यांच्या परिवाराने त्यांना घरीच उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.".
सनी देओलच्या टीमने जारी केलं स्टेटमेंट
"श्री. धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.. आम्ही माध्यमांना आणि सर्वांना विनंती करतो की, त्यांनी या काळात अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि त्यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आम्ही सर्वांच्या प्रेमासाठी, प्रार्थनांसाठी आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. कृपया त्यांचा आदर करा कारण ते तुमच्यावर प्रेम करतात."