Sunita Ahuja and Govinda pudhari
मनोरंजन

Sunita Ahuja and Govinda: माणूस धोकेबाज, त्यापेक्षा जनावरांवर.. गोविंदा अन् कुंकू लागलेल्या राणीला एकत्र पाहून भडकल्या सुनिता

Anirudha Sankpal

Sunita Ahuja and Govinda: प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आपल्या कथित गर्लफ्रेंड कोमल राणी स्वर्णकारसोबत लालबागच्या राजचे दर्शन करण्यासाठी गेला होता. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर आता सुनिता आहुजा यांची प्रतिक्रिया आली आहे.

मंगळवारी गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा यांना माध्यम प्रतिनिधिंनी गराडा घातला त्यावेळी त्यांनी गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांचे नाव न घेता टोमणा मारला.

सुनिता आहुजांच्या वेदना

पती गोविंदा कोमल राणी स्वर्णकार यांच्यासोबत दिसल्याने पत्नी सुनिता आहुजा जाम भडकल्या. त्या म्हणाल्या की, मनुष्यावर कितीही प्रेम करा त्याला काही अर्थ नाही. मनुष्य धोका देतो. जणावरांवर प्रेम करता ते कायम तुम्हाला चिकटून राहतील. जनावरांवर प्रेम करा मनुष्यावर करू नका. मनुष्य धोकेबाज असतो.'

कुंकू लावलेल्या कोमल राणीने लक्ष वेधले

मंगळवारी गोविंदा आणि कोमल ज्यावेळी लालबागच्या राजाच्या दरबारात आले त्यावेळी कोमल राणी स्वर्णकार यांनी आपल्या मांग मध्ये सिंदूर भरलं होतं. त्यामुळं त्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यावेळी लोकांनी देखील प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र नंतर समोर आलं की राणी यांनी बाप्पांचे दर्शन घेताना त्यांच्या पायावर माथा टेकला होता. त्यावेळी तिथले कुंकू हे त्यांच्या डोक्याला लागलं.

गोविंदा अन् सुनिता यांचा वाद

गोविंदाचे वैयक्तिक आयुष्य सध्या चव्हाट्यावर आलं आहे. गोविंदाचे नाव अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारशी जोडलं जात आहे. गोविंदा किंवा कोमल या दोघांपैकी एकानेही याबाबत सार्वजनिकरित्या कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.

मात्र गोविंदाला कोमलसोबत पाहून गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा यांनी सार्वजनिक प्रतिक्रिया देत मोठा गदारोळ निर्माण केला होता. सुनिता यांनी 'मुलीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरताना लाज वाटली पाहिजे. त्याचं डोकं खराब झालं आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT