Govinda Sunita Divorce Case : गोविंदाबरोबरील वादावर पडदा..! सुनिता आहुजाकडून घटस्फोटाचा खटला मागे

मॅनेजर शशी सिन्‍हा यांची माहिती, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आल्याबद्दल व्‍यक्‍क केली खंत
Govinda Sunita Divorce Case
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात वादावर पडदा पडला आहे.File Photo
Published on
Updated on

Govinda Sunita Divorce Case : गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात खळबळ उडाली होती. मात्र, आता या संपूर्ण वादावर पडदा पडला आहे. सुनिता आहुजा यांनी गोविंदाविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका अखेर मागे घेतली असून, गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

सुनिता आहुजा दिसल्‍या होत्‍या कौटुंबिक न्‍यायालयात

काही दिवसांपूर्वी सुनिता या वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात (फॅमिली कोर्ट) दिसल्या होत्या, तेव्हापासूनच विविध चर्चांना उधाण आले होते. आता त्या याचिका मागे घेण्यासाठीच न्यायालयात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Govinda Sunita Divorce Case
Govinda vs Sunita Ahuja | ‘सुनिताजी आप माँ बहेन की गालियाँ दे रही है’ : पत्‍नीची ‘शुगर डॅडी’ची टीका ऐकून गोविंदाला झोंबल्या मिरच्या!

सुनिता यांनी आपली केस मागे घेतली : शशी सिन्हा

'हिंदुस्तान टाईम्स'शी बोलताना गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले की, "सगळे इतके का घाबरत आहेत? सुनिताजींनी आपली केस मागे घेतली आहे, ही तर अत्यंत आनंदाची आणि सुखाची गोष्ट आहे. कोर्टात जाताना त्या खूप रागात दिसत असल्यामुळे सर्वांना काहीतरी मोठी अडचण वाटली असावी; पण आता दोघांमधील सर्व वाद मिटले असून परिस्थिती पूर्ववत झाली आहे."

घरातील भांडणे घरातच सुटायला हवीत

शशी सिन्‍हा यांनी कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आल्याबद्दल खंतही व्यक्त केली. "घरातील भांडणे घरातच सुटायला हवीत. बसून चर्चा केली की अनेक प्रश्न सुटतात. जर आज केस मागेच घ्यायची होती, तर ती आधी का दाखल केली? आज संपूर्ण जगासमोर आमचा तमाशा झाला, याचे नक्कीच वाईट वाटते," असे ते म्हणाले.

Govinda Sunita Divorce Case
Govinda-Sunita Divorce rumors| 'मागील २ वर्षे कठीण काळ..घरात अशांती.. ' गोविंदाच्या मुलीने सांगितले सत्य काय?

आरोपांचे सत्र आणि गोविंदाचे प्रत्युत्तर

गेल्या काही काळापासून सुनिता यांनी गोविंदावर अनेक गंभीर आणि वादग्रस्त आरोप केले होते. गोविंदाचे नाव त्यांची सह-कलाकार कोमल राणी स्वर्णकार यांच्याशी जोडत सुनिता यांनी त्याला 'शुगर डॅडी' असा टोलाही लगावला होता.यावर गोविंदानेही मौन सोडत म्‍हटलं होतं की, "तू माझ्या कामात हस्तक्षेप करत आहेस. जेव्हा तुला गरज होती, तेव्हा मी तुझ्या शोमध्ये सहभागी होऊन तुला पूर्ण सहकार्य केले. पण आता मी जेव्हा नवीन चित्रपटाचे काम सुरू केले आहे, तेव्हा माझी बदनामी करण्याची आणि माझे काम ठरवून बिघडवण्याची एकही संधी तू सोडत नाहीयेस." दरम्‍यान, गोविंदा आणि सुनिता यांचा विवाह मार्च १९८७ मध्ये झाला होता. मात्र, १९८८ मध्ये मुलगी टीना हिच्या जन्मापर्यंत त्यांनी आपले लग्न गुप्त ठेवले होते. या दांपत्याला यशवर्धन हा मुलगा देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news