Govinda vs Sunita Ahuja | ‘सुनिताजी आप माँ बहेन की गालियाँ दे रही है’ : पत्‍नीची ‘शुगर डॅडी’ची टीका ऐकून गोविंदाला झोंबल्या मिरच्या!

गोविंदा व त्‍याच्या पत्‍नी सुनिता आहूजा यांच्यातील वाद पेटला
Govinda vs Sunita Ahuja | ‘सुनिताजी आप माँ बहेन की गालियाँ दे रही है’ : पत्‍नीची ’शुगर डॅडी’ची टीका ऐकून गोविंदाला झोंबल्या मिरच्या!
Govinda vs Sunita Ahuja | ‘सुनिताजी आप माँ बहेन की गालियाँ दे रही है’ : पत्‍नीची ’शुगर डॅडी’ची टीका ऐकून गोविंदाला झोंबल्या मिरच्या!
Published on
Updated on

govinda vs sunita ahuja सध्या बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्‍याची पत्‍नी सुनिता आहूजा यांच्यातील वादाने सोशल मिडीयावर जागा घेतली आहे. सुनिता हिने काल गोविंदाला स्वताच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत आहेस थोडी लाज बाळग अशी टीका केली होती. ‘बहुत शुगर डॅडी बनके घुम रहे हो’ अशा शब्दात गोविंदावर टीका केली होती. त्‍याच्यावर आज गोविंदाने सुनिता हिला धमकीवजा इशारा दिला आहे. सोशल मीडियावरील चर्चा आणि जाहीर मुलाखतींमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे हा वाद सध्या मनोरंजन विश्वात चांगलाच गाजत आहे.

लोक आपको भी माँ बहेन की गाली देंगे

यावर आज गोविंदाने आपली पत्‍नी सुनिता हिला खूप आई बहिणीवरुन टिका करत असल्याचे म्हटले आहे. सुनिताजी आप माँ बहेन की गाली दे रहे हो, ये आपको शोभा नही देता’ असे म्हटले आहे. तसेच तुम्ही असे वागाल तर तुमचे अनुकरण करतात. तुम्ही अशा शिव्या देत राहिल्यातर लोकही तुम्हला अशाच शब्दात शिव्या देतील असे गोविंदा म्हणाला आहे. चाहत्यांनी त्यांच्या या असभ्य भाषेचे अनुकरण करण्यास सुरुवात केल्यास समाजासाठी ती अत्यंत लज्जास्पद बाब ठरेल असेही तो सुनिता यांना म्हटला आहे.

Govinda vs Sunita Ahuja | ‘सुनिताजी आप माँ बहेन की गालियाँ दे रही है’ : पत्‍नीची ’शुगर डॅडी’ची टीका ऐकून गोविंदाला झोंबल्या मिरच्या!
Govindas Wife Sunita: गोविंदा अॅडमिट झाल्यापासून पत्नी सुनीता होते आहे ट्रोल; यूजर म्हणतात, स्वत:चा नवरा……

काय आहे वादाची पार्श्चभूमी

काही दिवसांपूर्वी गोविंदा त्याच्या आगामी 'रूपा' या चित्रपटातील नवोदित सहकलाकार अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत मुंबई विमानतळावर एकत्र दिसला. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याविषयी विविध तर्कवितर्क सुरू झाले. /

सुनीता आहुजा यांचे आरोप

पापाराझींशी बोलताना सुनीता आहुजा यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला: "तो मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत आहे, त्याला थोडी तरी लाज वाटली पाहिजे," असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्रपट प्रदर्शित होण्याआधीच कशाचे प्रमोशन सुरू आहे, असा प्रश्न विचारत त्यांनी गोविंदाचा उल्लेख उपरोधाने 'शुगर डॅडी' असा केला. यावर गोविंदा याने आज समोर येत सुनिता यांच्या शिवराळ भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news