मनोरंजन

money heist : डेनवरने रोल मिळण्यासाठी खदाखदा हसून दाखवलं होतं

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

'मनी हाएस्ट'च्या (money heist) आपल्या फेव्हरेट कलाकारांविषयी जाणून घेणं कुणाला आवडत नाही. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहाेत मनी हाएस्टच्या डेनवरची कहाणी. 'मनी हाएस्ट' मधील (money heist) डेनवरचा जीवन प्रवास 'कभी खुशी कभी ग़म' राहिलं आहे. हाएस्टमध्ये भूमिका करताना त्याचे पितृछत्र हरवले; परंतु हाएस्टमध्ये त्याला  त्याची लाईफ पार्टनरही मिळाली होती. तुम्हाला माहितीये का, denver ही भूमिका मिळण्यासाठी ऑडिशन देणाऱ्याला प्रत्येक कलाकाराला हसून दाखवायचं होतं. आणि denver ने हसून दाखवलं- "हे हे हे हे हे हे हे हे हे …"

डेनवर चं खरं नाव आहे-जेमी लोरेंते. (jaime lorente) त्याचा जन्म १२ डिसेंबर, १९९१ मध्ये झाला. जेमीला एक मोठी बहिण आहे-जूलिया. रेंतला बालपणापासून अभिनयाची आवड होती. पुढे त्याने स्पेनमध्ये एका अभिनय स्कूलमध्ये प्रवेश घेतला.

money heist डेनवरची भूमिका साकारणारा जेमी लोरेंते

कोठून आलं इतकं हसू?

denver ला पाहताचं कानांमध्ये त्याचं जनरेटर हास्य घूमू लागतं. तसं पाहिलं तर denver ही भूमिका लोकप्रिय होण्यामागे त्याचं हास्य आहे. लोंतेरे खरंच हे हे हे हे हे हे हे हे असं हसतो? या हास्यामागं एक कहाणी आहे. जेमी (jaime lorente) एकदम नॉर्मल लोकांप्रमाणे हसतो. त्याचं हे खदाखदा हसणंच लेखकाला भावलं. कारण, त्याच्या स्क्रिप्टमध्ये असा हसणारा denver हवा होता.

denver च्या भूमिकेसाठी ज्या कलाकारांचे ऑडिशन घेण्यात आले होते. त्या सर्वांना केवळ हसायला लावलं होते. जेव्हा जेमीची वेळ आली. तेव्हा तो इतका हासला की, त्याचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. जेमीच्य़ा हे हे हे हे हे अशा हसण्यावर त्याला या भूमिकेसाठी निवडण्यात आलं होतं.

जेमी म्हणतो की, या हास्याची प्रेरणा त्याला १९७८ मध्ये रिलीज झालेल्या 'ग्रीस' चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातील अभिनेता डॅनी जुकोचं फेमस हसू असंच होतं.

मनी हाएस्टसोबत ही सीरीजही पाहा

जर तुम्ही 'मनी हाएस्ट' पाहिलाय. तर जेमीला नेटफ्लिक्सवर उपलब्ध असणारी दुसरी सीरीज 'एलीट'मध्ये पाहू शकता. तसेच 'एल सीआयडी' पाहा. हा एक हिस्टोरिकल ड्रामा आहे. यामध्ये जेमी एक योद्ध्याच्या भूमिकेत आहे.

money heist डेनवरची भूमिका साकारणारा जेमी लोरेंते

मनी हाएस्टची ही अभिनेत्री होती जेमीची गर्लफ्रेंड

'मनी हाएस्ट'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्य़े ब्रिटिश अम्बेसेडरच्या मुलीची भूमिका एलिसन पार्करने साकारली होती. तिचं खरं नाव आहे- मारिया पेड्राजा. रिअल लाईफमध्ये जेमी आणि मारिया पेड्राजा रिलेशनशीपमध्ये होते. पण, आता ते वेगळे झाले आहेत. जेमी-मारियाची पहिली भेट 'इलीट'मध्ये झाली होती. या शोमध्ये जेमीने नॅनोची भूमिका साकारली होती. तर मारिया मरीनाच्या भूमिकेत होती.

कवीदेखील आहे जेमी

जेमी केवळ अभिनेताचं नाही तर कवी देखील आहे. मार्च २०१९ मध्ये लोरेंतेच्या कवितांचं एक पुस्तक छापलं गेलं होतं. जेमीच्या कवितांमध्ये प्रेमाची धार वाहू लागते.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT