मनोरंजन

KGF 2 : तुफान चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा धमाकेदार व्हिडिओ रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कन्नड सुपरस्टार यशचा आगामी चित्रपट KGF 2 चे चाहत्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तुफान चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा धमाकेदार व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये यशची सुपर स्टाईल पुन्हा एकदा चर्चेत आलीय. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (KGF 2 )

तुफान गाणं गाजतयं…

सुपरस्टार यशचा सुपरहिट चित्रपट KGF, केजीएफ २ च्या सिक्वेलची अनेक दिवसांपासून चर्चा होतेय. आता हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'तुफान' या पहिल्या धमाकेदार गाण्याचा व्हिडिओ रिलीज केला आहे. या गाण्याने रिलीज होताच धुमाकूळ घातला असून हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

यश आणि श्रीनिधी शेट्टीच्या या चित्रपटाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. या अॅक्शन चित्रपटात यशने रॉकीची भूमिका साकारली होती. चित्रपटातील या गाण्यात रॉकी या पात्राचा आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या गाण्याला पसंती मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT