मनोरंजन

bigg बॉस marathi 3 : आपलेच मित्र आपल्या मागून एवढी इज्जत नाही काढत…

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बिग बॉस मराठीच्या ( bigg बॉस marathi 3 ) घरामधून काल कोणताच सदस्य घराबाहेर पडला नाही. मात्र मीराला फसवलं… ती घराबाहेर जाणार असं वाटतं असतानाच तिला चिठ्ठी मिळाली ज्यात फसवलं असे लिहिले होते.

आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राईझ मिळणार आहे. कारणं घरामध्ये एन्ट्री होणार नव्या सदस्यांची… म्हणजेच स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची. आता हे तिघे घरात गेल्यानंतर सदस्यांमधील नाती किती बदलणार ? घरातील समीकरण किती बदलणर ? हे हळूहळू समजणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले की, घरात येत आहेत नवीन सदस्य आणि एन्ट्री झाली स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची. घरामध्ये एन्ट्री घेताच स्नेहाने साधला जयवर निशाणा. त्याला सुनावले खडेबोल.

यावेळी स्नेहा म्हणाली की, 'या घरात सुरुवातीपासूनच जो कोणी माझ्याशी गेम खेळत होता तो फक्त जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढतं….'.

त्यामुळे बघूया हे तीन नवे सदस्य घरामध्ये गेल्यावर अजून काय- काय घडणार आजच्या भागामध्ये. तेव्हा पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT