Nitin Kaka Patil : नितीन काका चेअरमन होऊन घरात आले अन् स्व. लक्ष्मण तात्यांचे घर गहिवरले | पुढारी

Nitin Kaka Patil : नितीन काका चेअरमन होऊन घरात आले अन् स्व. लक्ष्मण तात्यांचे घर गहिवरले

सातारा; हरिष पाटणे

मा. खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांची नितीन काका चेअरमन व्हावेत अशी अतीव इच्छा होती, त्यांच्या हयातीत नितीन काकांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन पद मिळाले नाही. मकरंद आबांच्या प्रचंड आग्रहाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नितीन काकांना (Nitin Kaka Patil) चेअरमन करून स्व. लक्षणराव पाटील यांचे स्वप्न पूर्ण केले,

बऱ्याच दिवसानंतर तात्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी झाली. याच फटाक्यांच्या आतषबाजीत नितीन काका घरी आले. तेव्हा त्यांच्या समोर होती स्व. तात्यांची प्रतिमा. त्यानंतर तात्यांचा प्रतिमेला पुष्पहार घालताना नितीन काकांना मकरंद आबांना गहिवरून आले, आई सुमन काकी यांनी नितीन काकांना जवळ घेतले तेव्हा तात्यांच्या आठवणीने त्यांचे थोरले चिरंजीव मिलिंद दादा पाटील, आ. मकरंद आबा पाटील यांच्यासह तात्यांचा समस्त परिवार कमालीचा भावुक झाला. (Nitin Kaka Patil)

हेही वाचा

Back to top button