rohit raut new song viralwali love story  
मनोरंजन

गायक रोहित राऊत याची वायरलवाली Love Story

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

हृदयात वाजे समथिंग, हे नाते कोणते अशी सुपरहिट गाणी गायलेला गायक रोहित राऊत आता "वायरलवाली Love Story" घेऊन येत आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर वायरलवाली Love Story हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. रोहित राऊत याच्यासह सोनाली सोनावणेनं या म्युझिक व्हिडिओतलं "वायरलवाली Love Story" हे धमाकेदार गीत गायलं आहे.

सोनाली सोनावणे

सप्तसूर म्युझिक आणि नवसत्य एंंटरटेन्मेंट यांनी वायरलवाली Love Story हा म्युझिक व्हिडिओ प्रस्तुत केला आहे. सप्तसूर म्युझिकचे "जोडी दोघांची दिसते चिकणी" हे सोनाली सोनावणेचे गाणंही हिट आहे. "वायरलवाली Love Story" म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन नवनाथ निकम यांनी केलं आहे. शालू देवतळे थूल यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.

स्वप्नील अर्पेल यांनी छायांकन केलं आहे. तर निधी साळवे आणि आदी मांडवकर ही नवी जोडी या म्युझिक व्हिडिओत झळकली आहे.
रोहितनं आजपर्यंत अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्याचं प्रत्येक गाणं त्याच्या चाहत्यांना आनंद देणारं आहे. त्यात आता वायरलवाली Love Story या नव्या गाण्याचीही भर पडणार आहे. तुझी माझी लव्हस्टोरी सुरू झाली.

एक नंबर वायरल झाली असे आजच्या यूथच्या तोंडी असलेले शब्दच या गाण्यातून ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे रोहितची वायरलवाली Love Story त्याच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरणार यात शंका नाही.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT