मनोरंजन

सिद्धांत चतुर्वेदीच्या ‘खो गए हम कहाँ’ची घोषणा

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबी यांनी आपला आगामी थिएट्रिकल प्रोजेक्ट 'खो गए हम कहाँ' ची घोषणा करत पोस्टर आणि व्हिडिओचे अनावरण केले आहे. 'खो गए हम कहाँ' चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

तरुण, ताजी आणि प्रासंगिक या चित्रपटात मुंबई शहरातील तीन मित्रांची 'डिजिटल' कहाणी दाखवण्यात आली आहे. 'खो गए हम कहाँ' याची पटकथा झोया अख्तर, अर्जुन वरैन सिंह, रीमा कागती यांनी लिहिली आहे.

झोया अख्तर, रीमा कागती, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात तरुण आणि प्रतिभाशाली अभिनेते सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अर्जुन वरैन सिंह याचा पहिल्यादाच या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.

झोया अख्तरच्या 'गली बॉय'च्या तुफान यशानंतर सिद्धांतचे (एमसी शेर) नाव चाहत्यांच्या घराघरात पोहोचले. सिद्धांतने सध्या या चित्रपटात अनन्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्याला या चित्रपटात पाहण्यास चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आदर्श गौरवलादेखील या दोघांसोबत एकत्र पाहण्याची आतुरता चाहत्यांमध्ये वाढली आहे. आदर्शचे 'द व्हाइट टाइगर' मधल्या अभिनयासाठी खूप कौतुक झाले होते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT