शिवानी सुर्वे 
मनोरंजन

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे : शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेचे तिसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमधून अभिनेत्री शिवानी सुर्वेचा वेगळा डॅशिंग लूक समोर आला आहे. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा एक ॲक्शन – रोमँटिक चित्रपट आहे. यातील प्रत्येक कलाकाराच्या आतापर्यंतच्या लूकवरुन मराठी सिनेमात हा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे असं म्हणता येईल. युनिफॉर्म, हातात बंदूक आणि डोळ्यात राग असा शिवानीचा लूक आतापर्यंत कोणी पाहिला नसेल असा आहे.

मराठी -हिंदी मालिका , मराठी सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्यानंतर शिवानीचा हा लूक हा थक्क करणारा आहे. गोरा रंग, गोंडस चेहरा, आत्तपर्यंत शिवानीला सुंदर नायिकेच्या रुपात पाहिले आहे. आता हा तिचा ग्लॅमरस नसलेला लूक आहे. त्यामुळे तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या या लूक बद्दल आणि या सिनेमातल्या भूमिकेबद्दल लवकरच उलगडा होणार आहे.

शिवानी तिच्या या लूकबद्दल सांगते. "आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा माझ्यासाठी खूप महत्वाचा सिनेमा आहे. आम्हाला हा लूक करताना खूप मजा आली. खरंतरं स्वतःला या गणवेशात पाहणं सुरुवातीला वेगळं वाटत होतं आणि याची सवय होण्यासाठी मला एक दिवस गेला. माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता. आपल्याकडे साधारणपणे नायिकेला सुंदर दाखवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण या भूमिकेची गरज अशी होती. की आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, हा लूक ठरवावा लागला होता. एखाद्या कलाकाराला खूप वर्षे लागतात चांगली भूमिका मिळवण्यासाठी आणि मी म्हणेन की माझ्यासाठी हा बेस्टेस्ट रोल आहे. मी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेच्या मुळापाशी जाऊन मी काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर हा लूक घेऊन येताना खूप आनंद होतो आहे."

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी – कन्नडा भाषेत चित्रीत करण्यात आला आहे. तर हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ या भाषेतही सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र यांनी केले आहे. या सिनेमात मराठी – कन्नडा कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र दिसून येणार आहे. मराठी सिनेमात ॲक्शन – रोमँटिक सिनेमा कमी येतात, त्यात हा सिनेमा वेगळा ठरणार आहे.

दीपक राणेंसोबत या चित्रपटाची निर्मिती विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT