राजाराणी चित्रपट २० सप्टेंबरला रिलीज होणार आहे Instagram
मनोरंजन

रोहन पाटील-अभिनेत्री वैष्णवी शिंदे जोडी झळकणार "राजाराणी" चित्रपटात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्रामीण पार्श्वभूमीवरील थरारक प्रेमकहाणी असलेला "राजाराणी" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी सोमवारी लाँच करण्यात आलं आहे. २० सप्टेंबर २०२४ पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रसिद्ध अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत राजाराणी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे.

चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी हे आहेत.

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अनेक प्रेमकथा आजवर अनेक चित्रपटांतून दाखवल्या गेल्या आहेत. मात्र, प्रत्येक कथेचं काही ना काही वेगळेपण होतं. "राजाराणी" या चित्रपटाच्या पोस्टरवर आग लागलेल्या परिस्थितीत एक तरुण-तरुणी एकमेकांचा हात धरुन असल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात इतकं काय थरारक घडलं असेल याची उत्सुकता या पोस्टरमुळे वाढली आहे. म्हणूनच एक थरारक प्रेमकहाणी अशी टॅगलाईन लिहिलेल्या या चित्रपटाची कथा रंजक असणार यात शंका नाही. त्यामुळे सकस कथा, उत्तम कलाकार असलेला "राजाराणी" आता मोठ्या पडद्यावर येण्याची वाट पहावी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT