मनोरंजन

Forbes Billionaires 2022 : सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिहाना, कॉस्मेटिक ब्रँडमुळे कोट्यवधींची कमाई

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ही चर्चेत असेलली गायिका आहे. (Forbes Billionaires 2022) सध्या रिहाना प्रेगेन्सीचा काळ अनुभवत आहे. ती लवकरच आई होणार आहे. आई होण्यापूर्वी रिहानासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती एका खास कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. (Forbes Billionaires 2022)

रिहानाचे नाव फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही सामील झाले आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत तिने प्रथमच स्थान मिळवले आहे. फोर्ब्सनुसार, रिहानाची एकूण संपत्ती १.७ अब्ज डॉलर म्हणजे भारतीय चलनात सुमारे १२६१८.६८ कोटी रुपये आहे. रिहानाची कमाई तिच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट कंपनीद्वारे झाली आहे.

२०१७ मध्ये, रिहानाने एका फ्रेंच लक्झरी फॅशन-सौंदर्य उत्पादन कंपनीच्या सहकार्याने स्वत:चा कॉस्मेटिक ब्रँड सुरू केला. त्यात रिहानाची ५० टक्के हिस्सेदारी आहे. अलीकडेच बारबाडोसने तिला नॅशनल हिरोईनची पदवी दिलीय.

बारबाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानाचे खरे नाव रॉबिन रिहाना फेंटी आहे. रिहानाने वयाच्या १६ व्या वर्षीच गाणं गाणे सुरू केले. त्यानंतर ती अमेरिका आणि खूप प्रसिद्ध पॉप स्टार बनली. २००५ मध्ये रिहानाने तिच्या पहिल्या दोन अल्बमसह आपली छाप पाडली. रिहानाने म्युझिक ऑफ द सन (२००५) आणि अ गर्ल लाइक मी (२००६) मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. ३३ वर्षीय रिहानाला ९ ग्रॅमी पुरस्कार, १३ अमेरिकन म्युझिक ॲवॉर्ड, १२ बिलबोर्ड म्युझिक ॲवॉर्ड आणि ६ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

रिहाना ही सर्वात श्रीमंत महिला संगीतकारांपैकी एक आहे. फोर्ब्सनुसार, रिहानाची एकूण संपत्ती सुमारे ६०० दशलक्ष डॉलर्स (४४०० दशलक्ष) आहे. गायकासोबत, रिहानाचा स्वतःचा फॅशन ब्रँड देखील आहे, ज्याचे नाव फेंटी आहे. रिहाना एका नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनची संस्थापिकादेखील आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT