Raveena Tandon Brother House Theft pudhari
मनोरंजन

Raveena Tandon Brother House Theft: ५ वर्षांचा विश्वास एका झटक्यात हवेत! रवीना टंडनच्या आईचे २५ लाखांचे दागिने चोरणारी महिला नेमकी कोण?

Anirudha Sankpal

Raveena Tandon Brother House Theft: जुहू पोलिसांनी २५ लाखाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या ४७ वर्षाच्या एका महिलेला अटक केली आहे. या महिलने अभिनेत्री रवीना टंडनचा भाऊ राजीव टंडन यांच्या घरात चोरी केली होती. संशयीत महिला ही खार भागात रहात होती. संबंधित संशयीत महिला रवीना टंडनच्या वयस्कर आईची केअर टेकर होती. ती नेहमी घरात येत जात होती. तिने तिजोरी तोडून त्यातील रवीना टंडनच्या आईचे दागिने चोरल्याचा तिच्यावर आरोप आहे. याचबरोबर तिने राजीव टंडन यांची दोन महागडी घड्याळे देखील चोरल्याचा तिच्यावर संशय होता.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव राशी छाब्रिया असं असून ती खारमध्ये राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव टंडन यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. राजीव टंडन हे चित्रपट निर्माजे असून ते जुहूमधील निप्पॉन सिटीत असलेल्या टंडन हाऊसमध्ये राहतात.

टंडन यांनी २०२५ मध्ये घराचे नुतनीकरण सुरू असताना घरातील मैल्यवान वस्तू या सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या मजल्यावर बहिणीच्या रूममध्ये ठेवले होते. दरम्यान, रवीना यांची आई वीना टंडन यांचे सोन्याचे दागिने आणि हिऱ्याचे दागिने राजीव टंडन यांच्या बेडरूममधील सेफमध्ये लॉक करून ठेवण्यात आले होते.

२ ऑक्टोबर २०२५ रोजी कुटुंबियांनी दसऱ्याच्या सणासाठी हे दागिने तिजोरीतून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे हे दागिने नसल्याचे आढळून आले. कोणीतरी तिजोरी फोडल्याचं दिसून आलं. त्यातील सोन्याचे, हिऱ्याचे दागिने चोरण्यात आले होते. तसेच महागडी घडाळ्या देखील गायब होती. यानंतर राजीव टंडन यांनी राशी छाब्रिया या टंडन कुटुंबियांच्या घरी २०२० पासून भेट देतात असं सांगितलं.

छाब्रिया यांच्या पतीचे आणि पालकांचे निधन झाल्यानंतर छाब्रिया यांची टंडन कुटुंबियांशी जवळीक वाढली. टंडन कुटुंबियांनी देखील तिला त्यांच्या घरात येण्याची परवानगी दिली. त्या कधी कधी जेवण करायच्या आणि राजीव यांच्या ८६ वर्षाच्या आईंची काळजी घ्यायच्या.

घरातील दुसऱ्या मजल्यावर फक्त कुटुंबीय आणि राशी यांनाच जाण्याची परवानगी होती. त्यामुळं राशी यांच्यावर संशय होता. राजीव टंडन यांनी तिला याबाबत विचारणा केली होती. मात्र राशीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र टंडन कुटुंबियांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जुहू पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच छाब्रिया यांनी त्यांनी तिजोरी उघडल्याचे आणि त्यातील दागिने, घड्याळ चोरल्याचे कबूल केलं. छाब्रिया यांनी दोन महागडी घड्याळे परत केली मात्र दागिने काही त्यांनी परत केले नाहीत. तिने हे दागिने जगदीश नावाच्या व्यक्तीला दिले होते. मात्र सतत पाठपुरावा करून देखील हे दागिने परत मिळाले नाहीत.

दरम्यान, राशी यांचा हा साथीदार कथित पोलीसांचा खबऱ्या असल्याचं सांगत होता. त्याने जर राशीने त्याच्यावर दागिने परत करण्यासाठी दबाव टाकला तर ड्रग्स प्रकरणात अडकवण्याची धमकी देत होता. या दागिन्यांमध्ये सोन्याच्या बांगड्या, ब्रेसलेट, लॉकेट, रिंग, इअररिंग, डायमंड स्टड्स मंगळसूत्र आणि इतर दागिने होते. याची किंमत २५ लाख रूपये होती. या दागिन्यांशी टंडन कुटुंबियांच्या भावनिक आठवणी जोडल्या गेल्या होत्या.

ज्यावेळी टंडन कुटुंबियांना छाब्रिया या सोन्याचे दागिने परत करत नाहीयेत असं समजल्यावर राजीव यांनी जुहू पोलीस ठाण्यात १९ मे रोजी गुन्हा दाखल केला. त्यानंतर जुहू पोलिसांनी २१ मे रोजी राशी छाब्रिया यांना अठक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस टंडन कुटुंबियांच्या दागिन्यांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT