Crime News: त्याच्याशीच लग्न करणार म्हणाली; संतापलेल्या बापाने लेकीची हत्या केली, मृतदेह आधी विहिरीत फेकला, मग बाहेर काढून...

आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न करण्याच्या हट्टावर ठाम असलेल्या १७ वर्षीय मुलीची तिच्याच जन्मदात्या बापाने निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
Crime News representative image
Crime News representative imagePudhari
Published on
Updated on

Crime News

बंगळूर: कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न करण्याच्या हट्टावर ठाम असलेल्या १७ वर्षीय मुलीची तिच्याच जन्मदात्या बापाने निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बाप स्वतःच बेपत्ता झाला होता. मात्र, महिनाभरानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेमसंबंधांना होता तीव्र विरोध

तिम्मरायाप्पा (वय ४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शेतकऱ्याचे नाव असून तो सिरा तालुक्यातील निंबेमरादहल्ली येथील रहिवासी आहे. त्याची १७ वर्षीय मुलगी टी. मेघना हीचे तिच्या आईच्या जवळच्या नातेवाईकातील एका इलेक्ट्रिशियन तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मेघनाच्या आईची त्यांच्या प्रेमाला संमती होती, मात्र वडील तिम्मरायाप्पाचा या लग्नाला तीव्र विरोध होता. याच वादातून हत्याकांड घडले.

Crime News representative image
Crime News: प्रेमात वेडी झाली अन् बापाचीच तिजोरी लुटली! प्रियकराच्या मदतीने लेकीनेच घरी टाकला सव्वा कोटींचा दरोडा

शेतात नेऊन आवळला गळा

१६ एप्रिल रोजी तिम्मरायाप्पाने मेघनाला शेतावर बोलावून घेतले. तिथे तिच्या प्रेमसंबंधांवरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. संतापात तिम्मरायाप्पाने स्वतःच्या मुलीचा गळा आवळून तिला ठार मारले.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह आधी विहिरीत फेकला नंतर...

मुलीचा जीव गेल्याचे समजताच तिम्मरायाप्पाने तिचा मृतदेह शेतातील विहिरीत फेकून दिला. मात्र, मृतदेह पाण्यावर तरंगून घटना उघडकीस येईल, अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळे त्याच दिवशी संध्याकाळी त्याने पुन्हा विहिरीतून मेघनाचा मृतदेह बाहेर काढला आणि अंधाराचा फायदा घेत जवळच्याच एका सुकलेल्या तलावाच्या पात्रात नेऊन तो पुरला.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने पत्नीसह पोलिस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर आठवडाभराने, म्हणजेच २३ एप्रिल रोजी तो स्वतः काही पैसे आणि दुचाकी घेऊन घरातून गायब झाला. पती आणि मुलगी दोघेही बेपत्ता झाल्याने घाबरलेल्या पत्नीने पुन्हा पोलिसांत तक्रार केली.

मित्राला विचारली अटकपूर्व जामिनाची माहिती; अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला

दोघांचेही मोबाईल फोन बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. दरम्यान, १५ मे रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, तिम्मरायाप्पा त्याच्या गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या एका मित्राला भेटायला आला होता. पोलिसांनी तपास केला असता, तो पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यांत दुचाकीवरून फिरत होता आणि मंदिरे किंवा बस स्थानकांवर झोपत होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने मित्राकडे "खुनाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन कसा मिळवायचा?" याबाबत विचारणा केली होती.

तिम्मरायाप्पाने कडबागरे येथील एका दुकानातून नवीन सिम कार्ड आणि एक जुना मोबाईल फोन खरेदी केला होता. त्या मित्राने टिम्मरायप्पाचा नवीन मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला. त्याचवेळी तो स्वतःच्याच गावात असल्याचे समजले. शनिवारी पोलिसांनी टिम्मरायप्पाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचा आव आणला. मात्र, पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर त्याने खुनाची कबुली दिली.

Crime News representative image
Crime News: धक्कादायक! २ हजारांचे भाडे थकल्याने पतीने घरमालकाला दिली पत्नी आणि १३ वर्षांच्या मुलीवर बलात्काराची परवानगी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news