मनोरंजन

Pushpa : ‘पुष्पा’ निर्मात्यांनी ‘उ अंतवा’ गाण्यासाठी गणेश आचार्य यांचे ऑपरेशन पुढं ढकलले

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Pushpa) अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाने कमाईत रेकॉर्ड केलं आहे. '83' आणि 'स्पायडरमॅन' या चित्रपटांना 'पुष्पा' चित्रपटाने टक्कर देत रेकॉर्ड केलं आहे. या चित्रपटातील गाणी चांगलीच व्हायरल झाली आहेत. जगभरातील लोक या चित्रपटातील गाण्यांचे रिल्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. बॉलिवूड सेलेब्रिटींसह क्रिकेटपटुंनीही याचे रिल्स बनवले आहेत. या चित्रपटातील 'उ अंतवा' हे गाणेही चांगलेच व्हायरल झालंय. या गाण्याविषयी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे.

एका मुलाखतीत कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी सांगितले की, अल्लू अर्जुन याने मला २ डिसेंबर रोजी फोन केला. त्याने सांगितले की, मास्टरजी आम्ही एक बनवणार आहे. यावेळी मी त्यांना सांगितले की, उद्या माझे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आहे. यामुळे लगेच नाही जमणार अस मी सांगितले. यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझ्या डॉक्टरांशी बोलून माझ्या ऑपरेशनची तारीख पुढं ढकलली. त्यानंतर त्यांनी मला बोलावून गाणे कोरिओग्राफ करण्यास सांगितले. आम्ही दोन दिवस रिअर्सल केली आणि गाण्याचे शूटिंग सुरू केले. मी पहिल्यांदाच सामंथाची कोरिओग्राफी केली आहे. असे गणेश आचार्य याने सांगितले. (Pushpa)

पुष्पा मधील 'उ अंतवा' या गाण्यावर अनेकांनी टीका केली आहे. या गाण्याचे बोल अनेकजण सेन्सिबल असल्याचे म्हणत आहेत. यातही सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. अशी गाणी चित्रपटाचा भाग असतात. अस काहीजण कमेंट करत आहेत. Pushpa)

पुष्पा चित्रपटाचे नव नवे विक्रम थांबण्याचे नावच घेत नाही अशी अवस्था आहे. चित्रपटाचे कोटीच्या कोटी उड्डाने सुरु असून त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आता पुष्पा च्या हिंदी डबने १०० कोटींचा गल्ला जमविला आहे. त्यामुळे या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. (Pushpa)

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT