Samantha Ruth Prabhu : ‘पुष्पा’ नंतर ‘लायगर’ मध्ये आयटम साँगचा धमाका | पुढारी

Samantha Ruth Prabhu : ‘पुष्पा’ नंतर ‘लायगर’ मध्ये आयटम साँगचा धमाका

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री समंथा रूथ – प्रभुचे ( Samantha Ruth Prabhu ) ‘पुष्पा’ मधील ‘Oo Antava Oo’ या आयटम साँगवर प्रेक्षक अजुनही थिरकत आहेत. या गाण्यातील संमथाची अदा आणि तिच्या मादकतेवर अख्खा इंडिया घायाळ झाल्याची अवस्था आहे. आता समंथा तिच्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईझ देण्याची शक्यता आहे. विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा आगामी चित्रपट लायगरमध्येही समंथाचे आयटम साँग असल्याची चर्चा आहे. जर सर्व काही जुळून आले तर या गाण्यात समंथा आणि विजय देवरकोंडा दिसतील आणि समंथाचे हे दुसरे आयटम साँग ठरेल.

या आयटम साँगसाठी ‘लायगर’चे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ हे अशा अभिनेत्रीच्या शोधात आहेत जिने आत्तापर्यंत आयटम साँग केलेले नाही. अनेक नावांवर विचारही झाला होतो, पण ‘पुष्पा’ मधील ‘ओ अंटावा..’ गाण्याला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर पुरी जगन्नाथ यांनी समंथाशीही  (Samantha Ruth Prabhu) संपर्क साधल्याची माहिती आहे. समंथाचा परफॉर्मन्स पाहून तिचे हे पहिलेच आयटम साँग असल्याचे पटत नाही. तिचे एक्सप्रेशन्स आणि स्टेप्स दोन्ही प्रेक्षकांना फक्त आवडले असून चाहते समंथावर फूल टू फिदा झाले आहेत. ‘पुष्पा’ची नायिका रश्मिका मंदानाला चित्रपटासाठी २ कोटी रूपये मिळाले होते तर समंथाला या आयटम साँगसाठी ५ कोटी रूपये मानधन दिले गेले अशी चर्चा आहे.

दरम्यान, ‘लायगर’ मधील आयटम साँगबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण समंथाच ( Samantha Ruth Prabhu ) हे आयटम साँग करण्याची दाट शक्यता आहे.

समंथाच्या पदरी हॉलिवूडचा सिनेमा ( Samantha Ruth Prabhu )

मागील वर्षापासून समंथा ( Samantha Ruth Prabhu ) नेहमी चर्चेत राहिली आहे. उलट तिने आपला पती नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यावर ती सर्व सीमा सोडून अनेक बोल्ड सिनेमा, साँग करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे दिसते. ‘फॅमिली मॅन’ या वेब सिरीज मध्ये तिने निगेटिव्ह भूमिका करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. ‘पुष्पा’ मधील आयटम साँगची तर सर्वत्र चर्चा सुरुच आहे. आता तिला एक हॉलिवूडचा सिनेमा सुद्धा मिळाला आहे. ‘Arrangements of Love’ असे या चित्रपटाचे नाव असून भारतीय लेखक Timeri N. Murari यांनी त्याची कथा लिहली आहे. या शिवाय ती विग्नेश शिवानी यांच्या Kaathuvaakula Rendu Kaadhal या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात समंथासह अभिनेता विजयसेतुपती ( Vijay Sethupathi )आणि अभिनेत्री नयनतारा ( nayantara ) हे देखिल असणार आहेत.

अर्थात यंदाचे वर्षे समंथा चाहत्याच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी चित्रपटांची तसेच ‘लायगर’ चित्रपटातील नव्या आयटम साँगची सर्वजण आतुरतेने वाट पहात आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button