मनोरंजन

‘Matrix Resurrections’ च्या प्रमोशनवेळी प्रियांकाने असा ड्रेस घातला की…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या मॅट्रीक्स रिसरेक्शन्स 'Matrix Resurrections' या हॉलिवूडपटामुळे (Priyanka chopda) चर्चेत आहे. मॅट्रिक्स रिसरेक्शन्सच्या प्रमोशनसाठी प्रियांका जेव्हा पोहोचली, त्यावेळी सर्वांच्या नजरा तिच्यावरचं खिळल्या होत्या. कारण होतं – तिचा चमचमता ड्रेस. 'Matrix Resurrections'

आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन ती करताना दिसतेय. नेहमी प्रमाणे ती आपल्या वेगवेगळ्या लूक मुळे चर्चेचा विषय बनलीय. फॅशनबाबतीत प्रियांका ग्लोबल आयकॉन बनलीय. ती कोणत्या ना कोणत्या तरी आउटफिटसोबत एक्सपेरिमेंट करताना दिसते.

प्रियांकाने मॅट्रीक्सच्या प्रमोशनसाठी चांदीसारखा चमकणारा सिल्वर रंगाचा ड्रेस घातला होता. रेड कार्पेटवर होणाऱ्या प्रीमियरसाठी प्रियांकाने हा ड्रेस निवडला. या ड्रेसमध्ये ती खूपचं सुंदर दिसत होती. या ड्रेसवर लाल रंगाचा शिमरी केप जोडण्यात आला होता. ऑफ शोल्डर या गाऊनमध्ये ती नेहमीसारखी ग्लॅमरसचा तडका लावताना दिसली.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तिचा खूप वेगळा अंदाज पाहायला मिळत होता. प्रत्येकाच्या नजरा तिच्यावरचं टिकून होत्या.

प्रमोशनवेळी नमस्ते करून केले अभिवादन

प्रियांका मॅट्रीक्स रिसरेक्शन्सच्या यूएस प्रीमियरमध्ये द मॅट्रिक्सचे कलाकार कीनू रीव्हज (Keanu Reeves), जाडा पिंकेट स्मिथ (Jada Pinkett Smith) यांच्यासोबत सहभागी झाली. यावेळी तिने प्रेक्षकांना नमस्ते करून अभिवादन केले.

यावेळी या कलाकारांसह Neil Patrick Harris आणि अन्य कलाकारांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. प्रियांका-निक सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी काही ना काही तरी पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे ७१.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT