पुढारी ऑनलाईन : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे ( priya marathe ) हिने छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध मालिका गाजवल्या. प्रिया मराठे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हटके फोटो शेअर करत असते. सध्या तिच्या सेल्फी फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
प्रिया मराठेने ( priya marathe ) नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर स्वत:चा सेल्फी फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रिया कमालीची ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. या फोटोत प्रियाने आपल्या तोंडावर बोट ठेवत हटके पोझ दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'एक गोष्ट सांगण्यासाठी मी खूप उत्सूक आहे…पण आता नाही'. असे लिहिले आहे. यावेळी तिच्या एका हातात मोबाईल देखील दिसत आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस करत आपआपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'दिवसेंदिवस young होतेस, काय खातेस', असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने 'ऊफ तेरी अदा. दिवसेंदिवस तू आणखीनच तरुण होत आहेस' असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे.
प्रियाने 'या सुखांनो या' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यानंतर चार दिवस सासूचे या मराठी मालिकेत काम केले. कसम से, 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', 'कॉमेडी सर्कस', 'साथ निभाना साथिया' या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
हेही वाचलंत का?