DA : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 'डीए'मध्ये ३ टक्क्यांची वाढ; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय | पुढारी

DA : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 'डीए'मध्ये ३ टक्क्यांची वाढ; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना डीए वाढवून देण्याच्या निर्णयावर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केला. मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए (DA) ३ टक्क्यांनी वाढवून देण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता डीए, डीआरमध्ये वाढ होणार असल्याने लाखो कर्मचारी, वेतनधारकांना केंद्राकडून दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२२ पासून डीए (DA), डीआर मध्ये ३ टक्के वाढ देण्यात आली आहे. सध्या हा महागाई भत्ता ३१ टक्के होता. ३ टक्के वाढ झाल्याने तो ३४ टक्के झाला आहे.सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यावधी कर्मचारी, पेंशनधारकांना होणार आहे. नियमावलीनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए, डीआर हा वर्षांतून दोनदा वाढवला जातो.

जानेवारी आणि जुलै महिन्यात हा दर वाढवला जातो. ही दरवाढ कर्मचार्‍यांना अपेक्षित होती. दरम्यान, महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील कार्यस्थळावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या पदानुसार आणि कामाच्या ठिकाणानुसार तो कमी-जास्त असू शकतो. मोदी सरकारच्या निर्णयाचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनर्सना होणार आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button